प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)

✓ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : २० मे २०२०
✓ उद्देश : भारतातल्या मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे
✓ अंमलबजावणी कालावधी : पाच वर्ष (2020-21 ते 2024-25)
✓ महत्त्वाचे घटक : केंद्रीय क्षेत्र योजना (सीएस) आणि केंद्र पुरस्कृत योजना (सीएसएस)
✓ या दोन महत्वाच्या घटकांसाठी एकूण अंदाजित 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
✓ यामध्ये केंद्राची 9,407 कोटी रुपये, राज्यांची 4,880 कोटी रुपये तर लाभार्थींची 5,763 कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.
✓ पुढील तीन विभागांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार :-

  • अ- उत्पादन आणि उत्पादकता क्षमतेमध्ये वाढ
  • ब- हंगामानंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांचा विकास
  • क- मत्स्यद्योग व्यवस्थापन आणि नियामक चौकट (आराखडा)

संकलन – बालाजी सुरणे
©Team Mpsc Mantra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *