पोलीस भारती अभ्यासक्रम

उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे. राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. 

पोलीस भारती लेखी परीक्षा स्वरूप :-

एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
परीक्षा कालावधी : ९० मिनिटे
भाषा : मराठी
प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी

लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम :-

१) अंकगणित – अंकगणित अभ्यासताना पाढे, सूत्र, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाचे सूत्रे, संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, लसावी व मसावी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा, सरासरी इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी- त्यात भारत व जागतिक भूगोलासंदर्भातील प्रश्नही विचारले जातात. देशाच्या इतिहासासंबंधातील प्रश्नांची संख्या कमी असली तरीही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती, आंदोलने, चळवळी, अहवाल, वृत्तपत्रे, समाजसुधारक यांचा अभ्यास करावा. विज्ञान घटकात महत्त्वाचे शोध- संशोधक, अणुशक्ती आयोग व अणुऊर्जा केंद्रे, संशोधन संस्था, संरक्षण क्षमता, मानवी आहारातील घटक, मानवी श्वसन संस्था, नियोजित अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र चाचण्या याकडे लक्ष पुरवावे.
३) बुद्धिमत्ता चाचणी- बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या अभ्यासासाठी सराव महत्त्वपूर्ण ठरतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अंकमालिका, अक्षरमालिका, अक्षरमाला, सांकेतिक लिपी, सांकेतिक चिन्ह, भाषिक संकेत, सम आणि व्यस्त संबंध, वेळ, दिशा, रांगेतील क्रम, नातेसंबंध यावर बेतलेले असतात.
४) मराठी व्याकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *