पैशाचा साठा

पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी RBI ने 1998 मध्ये वाय.व्ही.रेड्डी कार्यगट नेमला होता.

या कार्यागाताने M0, M1, M2, M3 हे चार प्रकार सुचवले.

पैशाचा साठा
M0 संचित पैसा (Reserve Money) RBI मधील बँकांच्या ठेवी + लोकांजवळील नोटा व नाणी + RBI मधील इतर ठेवी
M1 संकुचित पैसा  (Narrow Money) लोकांजवळील नोटा व नाणी + लोकांच्या बँकेमधील ठेवी + RBI मधील इतर ठेवी
M2 M1 + बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे + 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी
M3 विस्तृत पैसा (Broad Money) M2 + 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी + बँकांची मागणीदेय व मुदत कर्जे.
  • M0 – पायाभूत पैसा/उच्च क्षमतेचा पैसा
  • M1, M2, M3 – पैशाचा पुरवठा
  • M1 – सर्वाधिक तरल
  • M3 – सर्वात कमी तरल

पैसा गुणक: किती पायाभूत पैसा वाढविला कि किती पैशाचा पुरवठा वाढतो याला पैसा गुणाक म्हणतात.

पैशाचा संख्यात्मक सिद्धांत

  • आयर्विंग फिशर यांनी मांडला.
  • समीकरण: एखाद्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह आणि व्यवहाराची किमत सारखी असते.
  • पैशाचा पुरवठा वाढला कि किमती वाढतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *