पर्यावरणासंबंधित आंतरराष्ट्रीय संस्था

#निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धनसंस्था (IUCN) :

 • मुख्यालय – ग्लँड (स्विर्त्झलंड)
 • स्थापना – १९४८ मध्ये फाऊंटेनब्लू (फ्रान्स ) बैठकमध्ये या संस्थेची स्थापना झाली.
 • उद्देश – संकटग्रस्त प्रजातींची ‘रेड लिस्ट’ प्रसिद्ध केली जाते. IUCN ही शासकीय आणि बिगर शासकीय संस्थांची निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणारी एक संघटना आहे. या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंस्थेत निरीक्षण दर्जा प्राप्त आहे. भारताने दोनदा या अध्यक्षपद भूषवले आहे. १९८४-९० या काळात एम. एस. स्वामीनाथन तर २००८-१२ या काळात अशोक खोसला अध्यक्ष होते.

#•इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)

 • मुख्यालय – जिनिव्हा
 • स्थापना – १९८८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली.
 • ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे.
 • उद्देश – हवामानबदल आणि त्यांचे विविध परिणाम या विषायावर संपूर्ण जगाला स्पष्ट आणि शास्त्रीय दृष्टिकोन व माहिती देणारी ही आंतराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था स्वतः संशोधन करत नाही. हीने २००७ सालचे शांततेचे नोबेलही मिळवले आहे.
#संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
 • मुख्यालय – नैरोबी (केनिया)
 • स्थापना – १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली.
 • उद्देश – जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरील पर्यावरणीय विषयासंदर्भात यूनोची ही अधिकृत संस्था आहे. जागतिक पर्यावरण सुविधांच्या अंमलबजावणी संस्थांपैकी ही एक संस्था आहे. यांनी भारतात सौर ऊर्जा प्रकल्पाना मदत पुरवली आहे.

# वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF)

 • मुख्यालय – न्यूयॉर्क
 • स्थापना – १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.
 • उद्देश – जगभरातील विविध पर्यावरण संवर्धन कार्यक्रम ही संस्था पाठबळ देते. पर्यावरणाच्या संवर्धन, संशोधनावर कार्य करणारी ही आंतराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे.
# बर्ड लाइफ इंटरनॅशनल
 • मुख्यालय – केंब्रिज
 • स्थापना – १९२२मध्ये या संस्थेची स्थापना झाली.
 • उद्देश – जगातील निसर्ग संवर्धनासाठी असणारी सर्वांत मोठी भागीदारी असणारी ही संस्था आहे. पक्षी संवर्धनात अग्रेसर असणारी संस्था आहे. प्रजातीचा बचाव आणि अधिवास व प्रदेशांचे संवर्धन यासारखी कामे ही संस्था करते.

#•हरित हवामान निधी

 • मुख्यालय – सोंग्डो (दक्षिण कोरिया)
 • स्थापना – २००९ मध्ये या कोपेन हेगेन येथे झालेल्या कोप-१५मध्ये स्वीकारण्यात आलेल्या कोपेनहेगेन करारात कोपेनहेगेन हरित हवामान निधीचा उल्लेख सर्वप्रथम करण्यात आला.
 • २०१० मध्ये कॅन्कुन येथील कोप – १६ मध्ये निधीची स्थापना करण्यात आली.
 • उद्देश – हवामान बदलाशी अनुकूलन आणि उपशमन घडवून आणण्यासाठी विकसनशील राष्ट्रांना मदत व्हावी या हेतूने UNFCCC अंतर्गत या निधीची स्थापना केली. हा निधी विकसनशील सदस्य राष्ट्रांमधील विविध प्रकल्प, कार्यक्रम, धोरणे व इतर कृतींना आर्थिक सहाय्य करतो. जागतिक बँक ही या निधीची तात्पुरती विश्वस्थ म्हणून कार्य करते आहे.
Source : Maharashtra times.

Leave a Reply

Your email address will not be published.