निवडणूक आयोग

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. भारतातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या हाती सोपविलेली आहे.

✯ रचना-
▣ निवडणूक आयोगात मुख्य निर्वाचन आयुक्त आणि राष्ट्रपतींना वाटेल तेव्हा आणखी आयुक्त असतात.
▣ या आयुक्तांच्या नेमणुकीसाठी संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात.
✯ कार्यकाल-
▣ पदभार स्वीकारल्यापासून ६ वर्षे किंवा ६५ वर्षांची वयोमर्यादा (जे आधी संपेल तोपर्यंत) तो पदावर राहू शकतो.
✯ अधिकार आणि कार्य –
▣ भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून निवडणूक आयोगावर संविधानाने सोपविलेली कामे पुढीलप्रमाणे-
१) मतदारयाद्या तयार करणे
२) मतदारसंघाची आखणी करणे
३) राजकीय पक्षांना मान्यता आणि मतदान चिन्ह देणे
४) नामांकन पत्राची छाननी करणे
५) निवडणूक खर्चावर नजर ठेवणे इ.
✯ निवडणूक आयुक्तांची बडतर्फी-
▣ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला गरवर्तनाच्या किंवा अक्षम्यतेच्या कारणावरून संसदेच्या २/३ बहुमताने ठराव करून पदावरून काढले जाते.
▣ त्या पद्धतीनेच मुख्य निवडणूक आयुक्ताला बडतर्फ करता येऊ शकते. मात्र मुख्य आयुक्तांच्या शिफारशीशिवाय राष्ट्रपती इतर आयुक्तांना पदच्युत करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.