दुसरी पंचवार्षिक योजना

 • कालावधी-1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.
 • राष्ट्रीय विकास परिषदेची मंजुरी-2 मे 1956.
 • अध्यक्ष – पंडित नेहरू (पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात)
 • उपाध्यक्ष – टी.टी कृष्णमाचारी.
 • प्रतिमान – महालनोबीस प्रतिमान. (हे प्रतिमान 1928 च्या रशियातील फेल्डमनच्या सॅव्हीएट प्रतिमानावर आधारित)
 • भौतिक गुंतवणूक “भांडवली वस्तू” उत्पादनात केली तर दीर्घावधित मोठी आर्थिक प्रगती होते, यावर हे प्रतिमान आधारित.
 • महालनोबीस प्रतिमानाला पर्याय म्हणून “ब्रह्मानंद आणि वकील” यांनी “मजुरी वस्तू प्रतिमान” जाहीर केले.
 • या प्रतिमानुसार भांडवली वस्तूंपेक्षा “उपभोग्य वस्तूं”च्या उत्पादनावर जास्त लक्ष देणे, जेणेकरून रोजगार निर्मिती लवकर होईल मात्र सरकारने हे प्रतिमान स्वीकारले नाही.
 • योजनेचे उपनाव – भौतिकवादी योजना. (नेहरू-महालनोबीस योजना)

योजनेचे उद्दिष्ट:

 • राष्ट्रीय उत्पन्नात 4.5% वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य
 • सार्वजनिक खर्चाचे 4800 कोटी रुपयांचे लक्ष्य
 • वाहतूक दळणवळण-28%
 • उद्योग-24%
 • कृषी व सिंचन -20%
 • सामाजिक सेवा – 18%
 • जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगीकरण करणे.
 • 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार निर्मिती.
 • समाजवादी समाजरचनेचे तत्व. (या तत्वाचा प्रथम स्वीकार जाने.1955 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या “आवडी अधिवेशनात” घेण्यात आला,अध्यक्ष – यु.न ढेबर)

दोन खत कारखाने :

 1. 1961 – नांगल खत कारखाना (पंजाब)
 2. रुरकेला खत कारखाना – सोना नावाचे नायट्रोजन खत तयार केले जाते.

योजनेचे यशापयश:

 • राष्ट्रीय उत्पन्नात 4.2% वार्षिक वद्धीदर.(लक्ष्य-4.5%)
 • सार्वजनिक खर्च 4673 कोटीर (लक्ष्य-4800)
 • औद्योगिक वाढ मध्यम स्वरूपात.
 • 1960-61मध्ये अन्नधान्य उत्पादन 82 मिलियन टन झाले.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील घडामोडी :

 • 1956 – सुएझ कालव्याचा प्रश्न – ब्रिटन आणि इजिप्तमध्ये मालकीवरून युद्ध (sinai war) पेटले.
 • मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती-01 नोव्हेंबर 1956
 • भारताचे दुसरे औद्योगिक धोरण-30 एप्रिल 1956 ~ उद्योगांचे तीन अनुसूचीमध्ये विभाजन. या धोरणाद्वारे समाजवादी समाजरचना स्थापन.
 • 1957 मध्ये राज्यस्तरावर “खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची” सुरुवात.
 • 1960 मध्ये “सघन कृषी जिल्हा कार्यक्रम” (IADP) सुरू.
 • 1953- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ची स्थापना. तर दुसन्या योजनेत कार्यान्वित.
 • अणू ऊर्जा आयोग – 01 मार्च 1958 (अध्यक्ष डॉ. होमी भाभा)
 • 1 सप्टेंबर 1956 – भारतीय जीवन विमा निगम(LIC) ची स्थापना ~मुख्यालय – मुंबई ~ विविध 245 खाजगी संस्थांच्या एकत्रीकरणातून.
 • 30 ऑगस्ट 1957- Native sharee stockbrokers association’s ला मुंबई शेअर बाजार म्हणून अधिकृत मान्यता.

तीन लोह-पोलाद उद्योग:

 1. 1959-भिलाई लोह-पोलाद उद्योग (रशिया च्या मदतीने)
 2. 1959 – रुरकेला लोह-पोलाद उद्योग (जर्मनीच्या मदतीने)
 3. 1962- दुर्गापूर लोह-पोलाद उद्योग (ब्रिटन,जर्मनी आणि रशियाच्या मदतीने)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *