तैनाती फौज प्रणाली

 • तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली.
 • १७४८-४९ मध्ये डुप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डुप्लेक्सला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला.
 • अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती.
 • बेलस्लीने हिंदुस्थानात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला.

# लागू करण्याचे कारण:

फ्रान्सकडून धोका

भारतीय राज्यांचे इंग्रजांप्रती वाढते शत्रुत्व

महत्त्वाच्या अटी:

 1. संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.
 2. इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.
 3. आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.
 4. तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.
 5. संस्थानची देखरेख पाहण्यास रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा.

तैनाती फौजेचा स्वीकार

 1. १७९८:  हैदराबादच्या निजामाने
 2. १८००: बडोद्याच्या गायकवाडांनी
 3. १७९९:  म्हैसूरच्या वाडियार राजांनी
 4. १७९९:  तंजावरच्या राजाने
 5. १८०१:  अवधच्या नवाबाने
 6. १८०३:  दुसर्‍या बाजीराव पेशव्याने
 7. १८०३:  नागपूरच्या भोसल्यांनी
 8. १८०४:  शिंद्यांनी

तसेच राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, भरतपूर या संस्थानांनीसुद्धा तैनाती फौजेची पद्धत स्विकारली होती.

परिणाम

 • संस्थानिकांचे स्वातंत्र्य नाहीसे झाले
 • संस्थानिकांनी स्वत:ची फौज ठेवणे बंद केल्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली.
 • संस्थानातील जनतेला आणि उद्योगधंद्यांना असलेले संरक्षण नाहीसे झाले.
 • संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी ठरली.
 • संस्थानातील राज्यकर्त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली.

कंपनीला झालेले फायदे

@ कंपनीला भारतीय राज्याच्या खर्चात मोठे सैन्य उभे करता आले.

@ देशाच्या मोक्याच्या जागांवर कंपनीचे नियंत्रण

@ कंपनीला वाटणारी फ्रेंच्यांची भीती नाहीशी अली

@ भारतीय राज्यांच्या भांडणात कंपनी मध्यस्त बनली

@ कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार झाला

Leave a Reply

Your email address will not be published.