झारखंड विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 नोव्रहेंबर २०१९ रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या नक्षलग्रस्त राज्यात 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांत निवडणूक होईल आणि 23 डिसेंबला निकाल जाहीर होतील. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर, सात डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर व 20 डिसेंबर अशा पाच टप्प्यांत मतदान होईल. या विधानसभेचा कालावधी पाच जानेवारी 2020 पर्यंत आहे. विकलांगांसह ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या टपालाद्वारे मतदानाची सुविधा केंद्राने नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. तिचा पहिला वापर झारखंडच्या निवडणुकीत होईल.  राज्यात 81 आमदारांची विधानसभा आहे. बहुमतासाठी 41 चे संख्याबळ आवश्‍यक असते.

2014 चे पक्षीय बलाबल 
– एकूण जागा : 81 
– साध्या बहुमतासाठी : 41 
– भाजप : 37 
– झारखंड मुक्ती मोर्चा : 19 
– जेव्हीएम : 08 
– कॉंग्रेस : 06 
– अन्य : 06 
– एजेएसयू : 05 (भाजपबरोबर युती)

Leave a Reply

Your email address will not be published.