ज्वालामुखी आणि प्रकार

By Balaji Surne (7387789138)

 • ज्वालामुखी सामान्यतः भूकवचाला पडलेले गोलाकार छिद्र असून त्यातून पृथ्वीच्या अत्यंत तप्त, भूगर्भामधून तप्त वायू, पाणी, द्रव लाव्हारस आणि खडकांचे तुकडे बाहेर पडतात.
 • पृथ्वीच्या भूगर्भातील लाव्हारस व इतर पदार्थ ज्वालामुखीच्या नलिकेभोवती त्या पदार्थाचे निक्षेपण होऊन त्यास शंकाकृती आकार प्राप्त होतो, त्याला ज्वालामुखी शंकू असे म्हणतात.

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार:

 • जागृत ज्वालामुखी – ज्वालामुखीमधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो, तसेच त्यांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. त्यांना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. जगामध्ये सुमारे ५०० जागृत ज्वालामुखी आहेत.
 • निद्रिस्त ज्वालामुखी – ज्या ज्वालामुखीतून एके काळी जागृत ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत असत परंतु सध्या उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा ज्वालामुखीस निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी असे म्हणतात.
 • मृत ज्वालामुखी – ज्या ज्वालामुखीमध्ये पूर्वी एके काळी उद्रेक होत असत. आता उद्रेक होत नाहीत. त्यास मृत ज्वालामुखी म्हणतात.

लावारसानुसार ज्वालामुखीचे प्रकार :

 • ऍसिड लावा : सिलिकाचे प्रमाण ७०% पेक्षा जास्त. अतिशय घट्ट. रंगाने पिवळसर. उच्चं उत्कलन बिंदू.
 • बेसिक लावा : सिलिकाचे प्रमाण ३०-४०%. काळसर रंग. जास्त प्रवाही. शांत स्वरूपाचे ज्वालामुखी.

उद्रेकाच्या स्वरूपानुसार प्रकार :

१) केंद्रीय ज्वालामुखी : शिलारस नलिकेसारख्या भागातून पृष्ठभागावर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकूच्या आकाराची ज्वालामुखी पर्वत तयार होतात. उदा. फुजियामा (जपान), किलिमंजारो (टांझानिया)

२) भेगीय ज्वालामुखी : ज्वालामुखी उद्रेक होत असताना लाव्हा एखाद्या नलिकेद्वारा बाहेर न येत अनेक भेगांमधून बाहेर येतो. बाहेर येणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पाठारे तयार होतात. उदा. दख्खनचे पठार

लॅक्रोइक्सचे वर्गीकरण : 

 • ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्थानावरून लॅक्रोइक्सने ज्वालामुखीचे एकूण चार प्रकार पडले आहेत. विसुव्हियस प्रकारचा ज्वालामुखी यात येत नाही.
 • हवाईयन प्रकार : हे ज्वालामुखी शांत प्रकारचे असतात. विस्फोटक प्रकारचा उद्रेक होत नाही. शिलारस अतिशय पातळ असतो. वायू जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही.
 • स्ट्रॉम्बोलियन प्रकार : या प्रकारचे ज्वालामुखी विस्फोटक प्रकारचे असतात. शिलारस बेसिक प्रकारचा असतो.
 • व्हलकॅनिक प्रकार : स्ट्रॉम्बोलियन बेटाच्या जवळ असलेल्या लिपाली बेटावरील व्होलकॅनो यावरून हा ज्वालामुखी ओळखला जातो. विस्फोटक स्वरूपाचा ज्वालामुखी. घट्ट स्वरूपाचा शिलारस. ज्वालामुखीच्या वर काळ्या रंगाचे ढग जमतात.
 • पिलियन प्रकार : जगातील सर्वाधिक विस्फोटक प्रकारचा ज्वालामुखी. या ज्वालांचे प्रतिबिंब सभोवतालच्या ढगांवर पडून भयानक देखावा दिसतो.

ज्वालामुखीचे भौगोलिक वितरण :

१) पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगतचा प्रदेश : भूगर्भीयदृष्टय़ा हा भाग कमकुवत असून तिथे मोठय़ा प्रमाणावर भू-हालचाली होत असतात. या पट्टय़ांत उत्तर व दक्षिण अमेरिका यांचा पश्चिम किनाऱ्यालगतचा प्रदेश तसेच आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगतची बेटे आणि न्यूझीलंड इत्यादींचा समावेश होतो. जगातील एकूण ज्वालामुखींपकी ६६ % ज्वालामुखी या पट्टय़ात आहेत. त्यातील बहुतेक ज्वालामुखी जागृत असल्यामुळे या पट्टय़ाला पॅसिफिकचे अग्निकंकण असे म्हणतात. या पट्टय़ात रॉकी पर्वतातील हूड, शास्ता, रेनीयर, अँडीज पर्वतातील चिम्बोराझो व जपानमधील फुजियामा इत्यादी महत्त्वाचे ज्वालामुखी येतात.

२) अटलांटिक पट्टा : वेस्ट इंडिज, अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील आइसलँडपासून सेंट हेलेनापर्यंतची सर्व बेटे.

३) युरेशिअन पट्टा : ज्वालामुखीचा पट्टा युरोप आणि आशिया खंडाच्या मध्य भागातून घडीच्या पर्वतरांगांवरून गेला आहे. इटली, ग्रेशियन द्वीपसमूह, आम्रेनिया, आशिया मायनरमधील घडीच्या पर्वतरांगा, कॉकेशस पर्वत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान यांच्या सीमावर्ती प्रदेशात ज्वालामुखी आढळतात. यातील काही ज्वालामुखी अजूनही जागृत आहेत. उदा. व्हेसूव्हएस, एटना, स्ट्राम्बोली इ.

महत्त्वाचे:-

 • स्ट्रॉम्बोली – सिसिली बेटामधील जागृत ज्वालामुखी. भूमध्य समुद्रातील द्विपगृह म्हणतात.
 • कोटोपाक्सी – जगातील सर्वांत उंच ज्वालामुखी. दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतात.
 • ऑलिम्पस – सूर्यमालेतील सर्वांत उंच ज्वालामुखी. मंगळ ग्रहावर आहे.
 • व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स : अमेरिकेतील अलास्का राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखी प्रदेश. १९१२ मधील नॉव्हारूप्ता व मौंट कॅटमाई ज्वालामुखी स्फोटांमुळे या दरीची निर्मिती झाली.
 • बॅरेन –  भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी
 • रिंग ऑफ फायर – सर्वाधिक ज्वालामुखी पॅसिफिक महासागरात इंडोनेशिया देशालगतच्या बेटांवर आहेत. हा भाग ‘रिंग ऑफ फायर’ या नावाने परिचित आहे.

2 thoughts on “ज्वालामुखी आणि प्रकार”

 1. हि माहीती अाम्ही लाेकांन पर्यंत पाेचऊ हे कार्य तुमचे चांगले अाहे हा विषय वाॅटसाफ व्दाॅरे लाेकांन पर्यंत पाेचऊ जय संविधान जय भारत

Leave a Reply

Your email address will not be published.