जागतिक वारसा स्थळांची यादी

जागतिक वारसा स्थळांची यादी

या ठिकाणी भारतामध्ये असलेल्या जागतिक वारसा स्थळांची यादी देण्यात आली आहे. २०२२ पर्यंत भारतात ४० जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि एक मिश्र (कंचनगंगा राष्ट्रीय उद्यान) प्रकारचे वारसा स्थळ आहे. जागतिक वारसा स्थळांच्या संख्येमध्ये भारत जगात सहाव्या स्थानी आहे.

पहिल्यांदा १९८३ मध्ये अजिंठा लेणी, एलोरा लेणी, आग्रा किल्ला आणि ताजमहाल या स्थळांचा जागतिक वारसा समितीने वारसा स्थळांच्या यादीमध्ये केला आहे.

वारसा स्थळराज्यवर्ष
अजिंठा लेणीमहाराष्ट्र1983
वेरूळ लेणीमहाराष्ट्र1983
आग्रा किल्लाउत्तर प्रदेश1983
ताज महालउत्तर प्रदेश1983
सूर्य मंदिर, कोणार्कओडिशा1984
महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूहतामिळनाडू1984
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानआसाम1985
मानस वन्यजीव अभयारण्यआसाम1985
केवलदेव राष्ट्रीय उद्यानराजस्थान1985
गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्सगोवा1986
खजुराहो स्मारक समूहमध्य प्रदेश1986
हम्पी येथील स्मारकांचा समूहकर्नाटक1986
फतेहपूर सिक्रीउत्तर प्रदेश1986
पट्टाडकल येथील स्मारकांचा समूहकर्नाटक1987
एलिफंटा लेणीमहाराष्ट्र1987
ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरेतामिळनाडू1987
सुंदरबन राष्ट्रीय उद्यानपश्चिम बंगाल1987
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्सउत्तराखंड1988
सांची येथील बौद्ध स्मारकेमध्य प्रदेश1989
हुमायूंचा मकबरा, दिल्लीदिल्ली1993
कुतुबमिनार आणि त्याचे स्मारक, दिल्लीदिल्ली1993
भारताची माउंटन रेल्वेपश्चिम बंगाल, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश1999
बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसरबिहार2002
भीमबेटकाचे रॉक शेल्टर्समध्य प्रदेश2003
छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस)महाराष्ट्र2004
चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यानगुजरात2004
लाल किल्ला परिसरदिल्ली2007
जंतरमंतर, जयपूरराजस्थान2010
पश्चिम घाटकर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू2012
राजस्थानचे डोंगरी किल्लेराजस्थान2013
पाटण, गुजरात येथे राणी-की-वाव गुजरात2014
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्रहिमाचल प्रदेश2014
नालंदा, बिहार येथील नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळबिहार2016
कंचनगंगा राष्ट्रीय उद्यानसिक्कीम2014
ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल कार्यचंदीगड2016
अहमदाबादचे ऐतिहासिक शहरगुजरात2017
मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्समहाराष्ट्र2018
जयपूर शहर, राजस्थानराजस्थान2019
काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिरतेलंगणा2021
धोलावीरा (हडप्पा शहर)गुजरात2021
जागतिक वारसा स्थळांची यादी
जागतिक वारसा स्थळांची यादी
जागतिक वारसा स्थळांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *