चालू घडामोडी : 8 ऑगस्ट 2018

All-women expedition to Mt. Manirang :-
» हिमाचल प्रदेशातील माऊंट मणिरंग या शिखरावरील गिर्यारोहण मोहिमेसाठी संपूर्ण महिलांच्या पथकाला माहिती आणि प्रसारण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार ) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला.
» 1993 मध्ये महिलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
» 19 सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व 1993 च्या पथकातील सदस्य, गिर्यारोहक विमला नेगी करत आहेत.
» पथकात युवा गिर्यारोहकांबरोबरच 1993 च्या पथकातील 9 जणींचा समावेश आहे.
» पथकामध्ये उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल , सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश , हरियाणा,गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील मुलींचा समावेश आहे.

1993 ची मोहीम-
भारत-नेपाळ महिलांची 1993 मधली एव्हरेस्ट मोहीम, सर्व महिला असलेली पहिलीच मोहीम होती. क्रीडा आणि युवा मंत्रालय पुरस्कृत भारतीय गिर्यारोहण संघाने ही मोहीम राबवली होती. 21 सदस्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व बचेंद्री पाल यांनी केले होते. या ऐतिहासिक मोहिमेने त्या वेळी अनेक विक्रमांची नोंद केली होती.
माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या एकाच मोहिमेत सर्वाधिक 18 सदस्यांचा समावेश, एव्हरेस्टवर चढणाऱ्या एकाच देशातील सर्वाधिक 6 महिला. पथकातील संतोष यादव एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. तर डिकी डोल्मा एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या होत्या.

_______

  • India has become home to the world’s first-ever thermal battery plant. The thermal battery facility, inaugurated in Andhra Pradesh, will be owned by Bharat Energy Storage Technology Private Limited (BEST).

_______

मैत्री 2018 :-
» भारत आणि थायलंड मधील लष्कर सराव
» कालावधी – दोन आठवडे (6 ऑगस्ट रोजी सुरुवात)
» ठिकाण :- थायलंड

_______

देशातील पहिला ब्लॉकचेन जिल्हा :-
» हैद्राबाद येथे तेलंगणा सरकार स्थापन करणार आहे.
» यासाठी राज्य सरकारने ‘टेक महिंद्रा’ या कंपनिसोबत करार केला.

_______

RISECREEK : स्वदेशी बनावटीचे पहिले मायक्रोप्रोसेसर
» आयआयटी मद्रास मधील वैज्ञानिक व विद्यार्थ्यानी बनविला आहे.
» प्रोजेक्ट शक्ती अंतर्गत हा मायक्रोप्रोसेसर बनविण्यात आला.
» या प्रोजेक्ट अंतर्गत सहा असे मायक्रोप्रोसेसर बनविण्यात येणार आहेत. त्यातील हा पहिला आहे.

_______

  • Olympic champion Carolina Marin of Spain has become the first woman shuttler to win the women’s singles World Badminton Championships thrice with an emphatic victory over P.V. Sindhu of India in Nanjing, China on August 5, 2018.

_______

महिला हॉकी वर्ल्डकप 2018 :-
» विजेता संघ – नेदर्लंड
» उपविजेता संघ – आयर्लंड
» आवृत्ती – 14 वे महिला वर्ल्डकप
» ठिकाण – लंडन
» नेदर्लंडने विक्रमी 8 वेळा हा किताब जिंकला.
» भारताचे स्थान – आठवे

_______

Dr. Ajay Data from Jaipur, the Founder and CEO of Data XGen Plus, has become the first Indian to be appointed a council member of ICANN panel Country Code Names Supporting Organization (ccNSO)

 

Leave a Reply

Your email address will not be published.