चालू घडामोडी : 29 जानेवारी 2020

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य रामसर यादीत 

🔹 महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचा रामसर यादीत समावेश झाला असून आंतरराष्ट्रीय यादीत समावेश होणारे ते महाराष्ट्रातील पहिले पाणथळ प्रदेश ठरले आहे.
🔹 रामसर करार : हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे. इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून हा करार अमलात आला.
🔹 भारतातील रामसर क्षेत्र : अष्टामुडी (केरळ), चिल्का सरोवर (ओडिशा), ओकेरा (जम्मू काश्मीर), कोलेरू सरोवर (आंध्र प्रदेश), रेणुका (हिमाचल प्रदेश), रोपर (पंजाब), सांभर सरोवर (राजस्थान), त्सो मोरारी (जम्मू काश्मीर), वुलार सरोवर (जम्मू काश्मीर), भितरकणिका खारपुटीची वने (ओडिसा), हरिक (पंजाब), लोकटक सरोवर (मणिपूर), पोंग धरण सरोवर (हिमाचल प्रदेश), वेंबनाड- कोल (केरळ) इत्यादी.
🔹 रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांपकी वेंबनाड – कोल (केरळ) हे सर्वात मोठे तर रेणुका (हिमाचल प्रदेश) हे सर्वात लहान असे दलदलीचे क्षेत्र आहे.

ग्रॅमी पुरस्कार २०२०

अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहरात २६ जानेवारी २०२० रोजी 62 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. सर्वाधिक 8 श्रेणींमध्ये नामांकन प्राप्त लिज्जोला ट्रूथ हर्ट्ससाठी बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्ससह 3 पुरस्कार मिळाले आहेत. तर बिली एलिशने 5 ग्रॅमी पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. 6 शेणींमध्ये नामांकन मिळविणारी तसेच पुरस्कार प्राप्त करणारी बिली ही (18 वर्षे) सर्वात कमी वयाची गायिका ठरली आहे.
🔹 पुरस्कार विजेते :-
• सर्वोत्कृष्ट गीत:- बिली एलिश(गाणे/अल्बम :-बॅड गाय)
• बेस्ट पॉप सोलो:- लिज्जो(ट्रुथ हर्ट्स)
• बेस्ट कॉमेडी अल्बम:- डेव चॅपेल (स्टिक्स अँड स्टोन्स)
• डुओ ग्रूप परफॉर्मन्स:- डेन-शाय ( स्पीचलेस)
• आर अँड बी साँग:- पीजे मार्टिन (से सो)
• आर अँड बी परफॉर्मन्स :- अँडरसन पाक( कम होम)
• टॅडिशन पॉप व्होकल :- कोस्टेलो-इम्पोटर्स (लुक नाऊ)
• रॉक परफॉर्मन्स:- गॅरी क्लार्क( दिस लँड)
• सर्वोत्कृष्ट नृत्य:- द कॅमिकल ब्रदर्स (नो जियोग्राफी)
• बेस्ट रॅप:- डीजे खालिद(हायर)
• बेस्ट रॉक अल्बम:- केज द एलिफेंट.(सोशल कूस)
• बेस्ट स्पोकन वर्ड:- मिचेल ओबामा. ( बीकमिंग)
• बेस्ट म्युझिक फिल्म:- बेयॉन्से (होमकमिंग)
• बेस्ट कंट्री अल्बम:- तान्या टकर ( व्हाईल आय)

ग्रीनकार्डच्या नवीन नियमांना अमेरिकी न्यायालयाची मंजुरी

अमेरिकेचे कायम निवासी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीनकार्ड बाबत नवीन नियमांच्या अंमलबजावणीस तेथील सर्वोच्च न्यायालयाने २७ जानेवारी २०२० रोजी मंजुरी दिली आहे. जर स्थलांतरित लोक मेडिकेड, अन्न कुपन, गृहनिर्माण व्हाउचर्स यासारख्या सुविधांचा लाभ घेत असतील तर त्यांना ग्रीनकार्ड नाकारता येईल असे नवीन धोरणात म्हटले आहे.

जमीला मलिक यांचे निधन

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री जमीला मलिक यांचा राहत्या घरी २८ जानेवारी २०२० रोजी मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या ७३ वर्षांच्या होत्या. अनेक तेलगू, तमिळ, मल्याळी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या त्या पहिल्या केरळी महिला होत्या.

‘संविधान’ सर्वोत्कृष्ट शब्द

🔹 ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘संविधान’ या शब्दाला २०१९मधील सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून जाहीर केले आहे.
🔹 ‘संविधान’ या शब्दाने २०१९मध्ये सर्वांचे लक्ष आकृष्ट केले होते. २०१९मध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना संविधानाच्या कसोटीवर तपासले गेले. त्यामुळेच संविधान हा शब्द गेल्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याने आम्ही या शब्दाची सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून निवड करत आहोत, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने (ओयूपी) म्हटले आहे.
🔹 या आधी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आधार, डबा, चॉल, हडताल आणि शादी आदी शब्दांचा डिक्शनरीत समावेश केला आहे.
🔹 २४ जानेवारी रोजी ऑक्सफर्डची नवी आवृत्ती लॉन्च करण्यात आली आहे. ऑक्सफर्डची ही १०वी आवृत्ती आहे. त्यात ३८४ भारतीय शब्दांचा समावेश असून जगभरातील भाषांमधील एकूण एक हजार शब्दांचा समावेश या नव्या डिक्शनरीत करण्यात आला आहे.

देशातला पहिला अंडरवॉटर मेट्रो प्रकल्प

🔹 कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) लवकरच हुगळी नदीखालून धावणारी मेट्रो प्रत्यक्षात आणणार आहे.
🔹 हा देशातील पहिला अंडरवॉटर मेट्रो प्रकल्प ठरणार आहे.
🔹 या प्रकल्पातील ४८.५ टक्के फंडिंग जापान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून देण्यात आलं आहे.
🔹 भारतात सर्वात आधी कोलकात्यात १९८४ मध्ये मेट्रोची सुरुवात झाली होती. ही नॉर्थ-साउथ मेट्रो होती.

लवकरच आफ्रिकन चित्ते भारतात येणार

🔹 दक्षिण आफ्रिकेतील चित्ता हा वन्यजीव येत्या काळात भारतात आणला जाऊ शकतो. तशी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलात पहिल्यांदा आफ्रिकी चित्त्यांची पावले पडतील.
🔹 भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतील नामिबिया येथून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
🔹 सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत माजी वन्यजीव संचालक रणजीत सिंह, वन्यजीव महासंचालक धनंजय मोहन आणि वाइल्ड लाइफ डीआयजी यांचा समावेश आहे.
🔹 सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणीत सांगितले की कोर्ट या प्रकल्पावर देखरेख ठेवेल आणि समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल.

🔹 भारतीय जंगलांमध्ये १९५० पर्यंत चित्त्यांचे वास्तव्य होते. पण, त्यानंतर बेकायदा शिकार वाढल्याने तो नामशेष झाला. आशियाई चित्त्याची एक उपप्रजाती इराणकडे आहे. पण, इराणनने मात्र ती भारतास देण्यास नकार दिला आहे.


🔹 सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्या. बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणीत सांगितले की कोर्ट या प्रकल्पावर देखरेख ठेवेल आणि समिती दर चार महिन्यांनी आपला अहवाल सादर करेल.

🔹 भारतामध्ये १९५२ मध्ये शेवटचा चित्ता दिसल्याचा दावा माजी वनाधिकारी परवीन कासवान यांनी केला. केंद्र सरकारने २०१० मध्ये चित्त्याचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.  मध्य प्रदेशातील कुनो पालपूरमध्ये गुजरातमधील आशियाई सिंहांचेही पुनर्वसन केले जात आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले निवृत्त

🔹 भारतीय राजनायिक क्षेत्रात अमीट छाप उमटवून ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले २८ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले.
🔹 चीनमध्ये ते भारताचे राजदूत असताना गोखले यांनी डोकलामसारखा संवेदनशील पेचप्रसंग कुशलपणे हाताळला.
🔹 ते १९८१ साली परराष्ट्र सेवेत दाखल झाले.
🔹 हाँगकाँग, बीजिंग, न्यूयॉर्कमध्येही ते होते. चायना अँड ईस्ट एशियाचे संचालक, संयुक्त सचिवपद त्यांनी सांभाळले.
🔹 मलेशिया, जर्मनी, चीनमध्ये ते राजदूत होते. त्यांची २९ जानेवारी २०१८ रोजी परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली होती.

तरणजीत सिंग सन्धू अमेरिकेतील नवे राजदूत

🔹 भारतीय परदेश सेवेतील (आयएफएस) ज्येष्ठ सनदी अधिकारी तरणजीत सिंग सन्धू यांची भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी जाहीर केले.
🔹 सन्धू सध्या भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त आहेत. सन १९८८ च्या ‘आयएफएस’ तुकडीतील सन्धू वॉशिंग्टनमध्ये हर्षवर्धन श्रिंंगला यांची जागा घेतील. श्रिंंगला यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.