चालू घडामोडी : 27 जानेवारी 2020

युरोपियन युनियनच्या संसदेत ‘सीएए’विरोधात ठराव

या आठवड्याच्या सुरुवातीला युरोपियन युनायटेड लेफ्ट (नॉर्डिक ग्रीन लेफ्ट) या समुहाने भारताच्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात युरोपियन युनियनच्या संसदेत ठराव मांडला होता. या ठरावात संयुक्त राष्ट्राचे घोषणापत्र, मानवाधिकारांच्या सार्वभौमिक घोषणेच्या (युडीएचआर) कलम १५ सह २०१५ मध्ये भारत-युरोप संघाच्या सामरिक भागीदारी संयुक्त कार्य योजना आणि मनावाधिकारांवर युरोपीयन संघ-भारत यांच्यासंदर्भातील चर्चेचा उल्लेख करण्यात आला आहे. सीएएच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर युरोपियन युनियनच्या संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. 

अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. शरीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही धार्मिक भेदभावाविना बेवारस मृतदेहांवर अत्यंसंस्कार करीत आहेत. 

राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडलेल्या गोष्टी

🔹 चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग
प्रथमच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर संचलनात दिसून आले. ही दोन्ही हेलिकॉप्टर काही दिवसांपूर्वीच भारतीय वायू सेनेमध्ये दाखल झाली आहेत.
🔹 महिलेने केले पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व
कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान पुरूषांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
🔹 ‘धनुष्य’ तोफ आली जगासमोर
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात तयार झालेली ‘धनुष्य’ तोफ पहिल्यांदाच जगासमोर आली. गेल्या आठवड्यातच या तोफा सैन्यात सहभागी झाल्या होत्या.
🔹 सैन्यातील महिलांच्या तुकडीने केले स्टंट
राजपथवरील संचलनात पहिल्यांदाच सैन्य दलातील महिलांनी मोटरसायकलवर स्टंट केले. ६५ सदस्यांच्या या टीमने ३५० सीसी रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकलवर आपल्या कवायती सादर करुन उपस्थितांना आश्चर्यचकीत केले.
🔹 राफेल विमानाची प्रतिकृती
गेल्या काही वर्षात सर्वाधिक काळ चर्चेत राहिलेल्या राफेल लढाऊ विमानांचे यावेळी पहिल्यांदाच जनतेला दर्शन घडले. वायू दलाने आपल्या पथसंचलनात या विमानांची प्रतिकृती सादर केली.

इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त १७,००० फुट उंचीवर ध्वजारोहण केले.

सिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी

NBA Los Angeles Lakers संघाकडून खेळणारा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय कोबे ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (NBA) सक्रिय होता. आपल्या काळात ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला NBA Championship मिळवून दिली होती. आपल्या कारकिर्दीत कोबेने १८ वेळा NBA All Star हा मानाचा किताब पटकावला होता.

शिवभोजन थाळी योजनेला सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये २६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी १० रुपयांत आहार मिळणार आहे. शिवभोजन योजनेतील भोजनालय ही दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींना जेवण्यासाठी बसता यावे अशी व्यवस्था असणार आहे. या एका भोजलनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध असेल.

Boeing 777X: World’s largest twin-engine jet completes first flight

The plane is the largest twin-engine jet ever built and has a wingspan so wide — more than 235 feet — it features folding wingtips that reduce that width by more than 20 feet so the plane can fit into various airport taxiways and gates. The 777X-9 is slightly longer than Boeing’s most iconic plane: the hump-backed ७४७,

Leave a Reply

Your email address will not be published.