चालू घडामोडी : 26 जानेवारी 2020

पहिल्यांदाच घडले असे

प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेट येथील अमर ज्योती जवान येथे प्रथम न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४८ वर्षांची परंपरा मोडीत काढली. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.  या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनीच उद्घाटन केले होते. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अमर जवान ज्योती स्मारक येथे जाऊन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहतात. १९७२ साली इंडिया गेट येथे १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सहभागी झाले. ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 

नागरिकत्व कायद्याविरुद्ध राजस्थानचाही ठराव

🔹 सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) रद्द करण्याचे केंद्र सरकारला आवाहन करणारा ठराव राजस्थान विधानसभेने शनिवारी संमत केला.
🔹 सीएएच्या विरोधात ठराव करणारे केरळ आणि पंजाबनंतरचे राजस्थान हे तिसरे राज्य ठरले आहे. तर पंजाबनंतरचे दुसरे काँग्रेसशासित राज्य ठरले आहे.
🔹 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) २०२० साठी नव्याने माहिती भरणे आवश्यक असलेले रकाने रद्द करावेत, असे आवाहनही केंद्र सरकारला या ठरावाद्वारे करण्यात आले आहे.

शौर्य पुरस्कार

🔹 ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जम्मू व काश्मीर पोलिसांना सर्वाधिक, म्हणजे १०८ शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. यामागोमाग ७६ पुरस्कार केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पटकावले आहेत.
🔹 काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये, शौर्यासाठी या वर्षी जाहीर झालेल्या ४ राष्ट्रपती पोलीस पदकांपैकी ३ पदकांचा समावेश आहे.
🔹 यामुळे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या एकूण २९० शौर्य पुरस्कारांपैकी जम्मू- काश्मीर पोलिसांना १०८ पदकांचा सिंहाचा वाटा मिळाला.
लष्कराच्या ६ जवानांना शौर्यचक्र :-
🔹 दहशतवादविरोधी आणि बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये शौर्य दाखवल्याबद्दल लष्कराच्या ६ सैनिकांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. यापैकी एकाला हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेगभाम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह आणि नायक नरेश कुमार यांचा समावेश आहे. नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आले आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते.

🔹 याचबरोबर उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, लष्काराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह १९ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.

करोना विषाणूची लागण ही ‘आणीबाणी’ असल्याचे हाँगकाँगने २५ जानेवारी २०२० रोजी जाहीर केले.

पद्म पुरस्कार 2020

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. पद्म पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्यामानला जातो. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण पुरस्कारार्थी

 • जॉर्ज फर्नांडिस – (मरणोत्तर) (सामाजिक सेवा-बिहार)
 • अरुण जेटली – (मरणोत्तर) (सामाजिक सेवा-दिल्ली)
 • सर अनेरूड जुगनॉथ जीसीएसके – (सामाजिक सेवा-मॉरेशियस)
 • मेरी कोम – (क्रीडा-मणिपूर)
 • छन्नुलाल मिश्रा – (कला- उत्तर प्रदेश)
 • सुषमा स्वराज – (मरणोत्तर) (सामाजिक सेवा- दिल्ली)
 • विश्‍वेशतीर्थ स्वामीजी – (मरणोत्तर) (आध्यात्म- कर्नाटक

पद्मभूषण :-

 • एम. मुमताज अली (आध्यात्म- केरळ)
 • सय्यद मुआज्जीम अली (मरणोत्तर) (सामाजिक सेवा-बांगलादेश)
 • मुझफ्फर हुसैन बेग (सामाजिक सेवा-जम्मू आणि काश्‍मीर)
 • अजय चक्रवर्ती (कला- पश्‍चिम बंगाल)
 • मनोज दास (साहित्य आणि शिक्षण-पुद्दुचेरी)
 • बालकृष्ण दोषी (अभियांत्रिकी- गुजरात)
 • कृष्णाम्मल जगन्नाथन (समाजसेवा- तमिळनाडू)
 • एस. सी. जमीर (समाजसेवा- नागालॅंड)
 • अनिल प्रकाश जोशी, (समाजसेवा- उत्तराखंड)
 •  त्सेरिंग लॅंडोल (वैद्यकीय- लडाख)
 • आनंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग- महाराष्ट्र)
 • नीळकंठ मेनन (मरणोत्तर) (समाजसेवा- केरळ)   
 • मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) (समाजसेवा- गोवा)
 • जगदीश सेठ (साहित्य आणि शिक्षण- अमेरिका) 
 • पी. व्ही. सिंधू (क्रीडा-तेलंगण)
 • वेणू श्रीनिवासन (व्यापार आणि उद्योग- तमिळनाडू)

पद्मश्री पुरस्कार –
पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्रसरकारने ११८ जणांची निवड केली आहे. राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पद्मश्री विजेते :-

 • गुरु शशधर आचार्य (कला- झारखंड)
 • डॉ. योगी एरॉन (वैद्यकीय- उत्तराखंड)
 • जयप्रकाश अगरवाल (व्यापार – दिल्ली)
 • जगदीशलाल अहुजा (सामाजिक कार्य- पंजाब)
 • काझी मासूम अख्तर (साहित्य आणि शिक्षण- पश्‍चिम बंगाल)
 • ग्लोरिया एरिएरा (साहित्य आणि शिक्षण- ब्राझील)
 • खान झहीरखान बख्तियारखान (क्रीडा- महाराष्ट्र)
 • डॉ. पद्मवर्ती बंदोपाध्यात (वैद्यकीय- उत्तर प्रदेश)
 • डॉ. सुशोवन बॅनर्जी (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल)
 • डॉ. दिगंबर बेहरा (वैद्यकीय- छत्तीसगड)
 • डॉ. दमयंती बेश्रा (साहित्य व शिक्षण- ओडिशा)
 • पोपटराव पवार (सामाजिक कार्य- महाराष्ट्र)
 • अभिराज मिश्रा (साहित्य व शिक्षण- हिमाचल प्रदेश)
 • बिनापनी मोहंती (साहित्य व शिक्षण- ओडिशा)
 • डॉ. अरुणोदय मोंडल (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल)
 • डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी (साहित्य व शिक्षण- फ्रान्स)
 • सत्यनारायण मुंदयूर (सामाजिक कार्य- अरुणाचल प्रदेश)
 •  मणिलाल नाग (कला- पश्‍चिम बंगाल)
 • एन. चंद्रशेखर नायर (साहित्य व शिक्षण- केरळ)
 • डॉ. तेस्तू नाकामुरा (सामाजिक कार्य- अफगाणिस्तान)- मरणोत्तर
 • शिवदत्त निर्मोही (साहित्य व शिक्षण- जम्मू व काश्‍मीर)
 • पु लालबियाकथंगा पाचुआउ (साहित्य व शिक्षण, पत्रकारिता- मिझोराम)
 •  मूळीक्कल पंकजाक्षी (कला- केरळ)
 • प्रसंताकुमार पटनाईक (साहित्य व शिक्षण- अमेरिका)
 • जोगेंद्रनाथ फुकन (साहित्य व शिक्षण- आसाम)
 • राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र)
 • योगेश प्रवीण (साहित्य व शिक्षण- उत्तर प्रदेश)
 • जीतू राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
 • तरुणदीप राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
 • एस. रामकृष्णन (सामाजिक कार्य- तमिळनाडू)
 • रानी रामपाल (क्रीडा- हरियाना)
 • कंगणा राणावत (कला- महाराष्ट्र)
 • दलवाई चलपती राव (कला- आंध्र प्रदेश)
 • शाहबुद्दीन राठोड (साहित्य व शिक्षण- गुजरात)
 • कल्याणसिंह रावत (सामाजिक कार्य- उत्तराखंड)
 • चिंताला वेंकट रेड्डी (कृषी- तेलंगण)
 • डॉ. शांती रॉय (वैद्यकीय- बिहार)
 • राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा)
 • बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा)
 • त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय)
 • हिंमतराम भांबू (सामाजिक कार्य- राजस्थान)
 • संजीव भिकचंदानी (व्यापार आणि उद्योग- उत्तर प्रदेश)
 • गफुरभाई एम. बिलाखिया (व्यापार व उद्योग- गुजरात)
 • बॉब ब्लॅकमन (सार्वजनिक व्यवहार- ब्रिटन)
 • इंदिरा पी.पी.बोरा (कला- आसाम)
 • मदनसिंह चौहान (कला-छत्तीसगड)
 • उषा चौमार (सामाजिक कार्य- राजस्थान)
 • लिल बहादूर छेत्री (साहित्य आणि शिक्षण- आसाम)
 • ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे) (कला-तमिळनाडू)
 • वज्र चित्रसेना (कला- श्रीलंका)
 • पुरुषोत्तम दधिच (कला- मध्य प्रदेश)
 • उत्सव चरणदास (कला-ओडिशा)
 • इंद्र दासनायके (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण- श्रीलंका)
 • एच.एम.देसाई (साहित्य आणि शिक्षण- गुजरात)
 • मनोहर देवादोस (कला- तमिळनाडू)
 • ओईनाम बेमबेम देवी (क्रीडा- मणिपूर)
 • लिया डिस्किन (सामाजिक कार्य- ब्राझील)
 • एम.पी.गणेश (क्रीडा-कर्नाटक)
 • डॉ. बंगलोर गंगाधर (वैद्यकीय-कर्नाटक)
 • डॉ. रमन गंगाखेडकर(विज्ञान आणि अभियांत्रिकी-महाराष्ट्र)
 • बॅरी गार्डिनर (सामाजिक व्यवहार- ब्रिटन)
 • चेवांग मोटूप गोबा (उद्योग आणि व्यापार- लडाख)
 • भारत गोयंका (व्यापार आणि उद्योग- कर्नाटक)
 • याडला गोपालराव (कला- आंध्र प्रदेश)
 • मित्रभानू गौनतिया(कला- ओडिशा)
 • तुलसी गौडा(सामाजिक कार्य-कर्नाटक)
 • सुजोय के. गुहा(विज्ञान आणि अभियांत्रिकी-बिहार)
 • हरेकाला हाजब्बा(सामाजिक कार्य-कर्नाटक)
 • इनामुल हक (पुरातत्वशास्त्र- बांगलादेश)
 • मधु मन्सुरी हसमुख (कला-झारखंड)
 • अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य-मध्य प्रदेश) (मरणोत्तर)
 • विमल कुमार जैन (सामाजिक कार्य- बिहार)
 • मीनाक्षी जैन (साहित्य व शिक्षण- दिल्ली)
 • नेमनाथ जैन (व्यापार व उद्योग- मध्य प्रदेश)
 • शांती जैन (कला- बिहार)
 • सुधीर जैन (विज्ञान व अभियांत्रिकी- गुजरात)
 • बेनिचंद्र जामाठिया (साहित्य व शिक्षण- त्रिपुरा)
 • के.व्ही. संपतकुमार आणि विदुशी जयलक्ष्मी के.एस  (संयुक्तपणे) (साहित्य आणि शिक्षण व पत्रकारीता- कर्नाटक)
 • करण जोहर (कला-महाराष्ट्र)
 • लीला जोशी (वैद्यकशास्त्र- मध्य प्रदेश)
 • सरीता जोशी (कला- महाराष्ट्र)
 • सी. कामलोव्हा (साहित्य व शिक्षण- मिझोरम)
 • डॉ. रवी कन्नन आर. (वैद्यकशास्त्र-आसाम)
 • एकता कपूर (कला-महाराष्ट्र)
 • याझदी नाओशिर्वान करंजिया (कला- गुजरात)
 • नारायण जे. जोशी करयाल (साहित्य व शिक्षण- गुजरात)
 • डॉ. नरिंदरनाथ खन्ना (वैद्यकशास्त्र- उत्तर प्रदेश)
 • नवीन खन्ना (विज्ञान व अभियांत्रिकी- दिल्ली)
 • एस.पी. कोठारी (साहित्य व शिक्षण-अमेरिका)
 • व्ही.के मुनुसामी कृष्णपख्तार (कला- पुद्दुचेरी)
 • एम.के. कुंजोळ (सामाजिक कार्य- केरळ)
 • मनमोहन महापात्रा (कला-ओडिशा)
 • उस्ताद अन्वर खान मंगनियार (कला- राजस्थान)
 • कट्टुंगल सुब्रह्मण्यम मणीलाल (विज्ञान व अभियांत्रीकी- केरळ)
 • मुन्ना मास्टर (कला-राजस्थान)
 • अदनान सामी (संगीत – महाराष्ट्र) 
 • विजय संकेश्वर (व्यापार – कर्नाटक) 
 • डॉ. कुशल कन्वर शर्मा (वैद्यकीय – आसाम) 
 • सईद महंमद शहा कुरेशी ( सामाजिक कार्य – आसाम) 
 • महंमद शरीफ (सामाजिक कार्य – उत्तर प्रदेश) 
 • श्‍यामसुंदर शर्मा ( कला – बिहार) 
 • डॉ. गुरदीप सिंह (वैद्यकीय- गुजरात) 
 • रामजी सिंह ( सामाजिक कार्य – बिहार) 
 • वशिष्ठ नारायण सिंह ( विज्ञान आणि तंत्रज्ञान – बिहार) 
 • दयाप्रकाश सिन्हा (कला – उत्तर प्रदेश) 
 • डॉ. सॅंड्रा देसा सुझा (वैद्यकीय – महाराष्ट्र) 
 • विजयसारथी श्रीभाश्‍यम (साहित्य – तेलंगण) 
 • श्रीमती काली शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी (संयुक्तपणे)(कला – तमिळनाडू) 
 • जावेद अहमद टाक (सामाजिक कार्य – जम्मू-काश्‍मीर) 
 • प्रदीप थलाप्पील (विज्ञान आणि तंत्रज्ञान – तमिळनाडू) 
 • येशी दोर्जी थोंगची (साहित्य – अरुणाचल प्रदेश) 
 • रॉबर्ट ट्रूमन (साहित्य – अमेरिका)
 • अगुस इंद्र उदयाना (सामाजिक कार्य – इंडोनेशिया)
 • हरिशचंद्र वर्मा (विज्ञान आणि तंत्रज्ञान – उत्तर प्रदेश) 
 • सुंदरम वर्मा (सामाजिक कार्य – राजस्थान) 
 • डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी ( व्यापार – अमेरिका) 
 • सुरेश वाडकर (कला – महाराष्ट्र) 
 • प्रेम वस्ता (व्यापार – कॅनडा)

उत्कृष्ट सेवा पदक

कर्तव्य बजाविताना शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या देशभरातील ६५७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवा पदके जाहीर केली. यात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, अतिविशिष्ट सेवापदक, उल्लेखनीय सेवापदक या पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ५४ अधिकाऱ्यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

जम्मू-काश्‍मीरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल जब्बार, उपअधीक्षक गाझी हसन शेख, आसीफ अब्दुल कुरेशी आणि ‘सीआरपीएफ’चे उत्पल राभा यांना मरणोत्तर राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील दहा अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदक, चौघांना अतिविशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि उर्वरित ४० जणांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस पदक मिळाले आहे.

शिवाजी पार्कवर महाराष्ट्राचा चित्ररथ

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग – कान्होजी आंग्रे’ या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आरमार उभारले. शिवरायांनी पहिल्यांदाच समुद्री सैनिकांची तुकडी निर्माण केली. ‘गुराब‘, ‘गलबते’, ‘तरांडे’, ‘तारू’, ‘शिबाड’, ‘मचवा’, ‘पगार’, ‘वाघोर’ अशा नौकांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी महाराज यांनीही सिद्दी, डच, पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी आरमाराचा विस्तार केला. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले; त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांनी साकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *