चालू घडामोडी : 23 जानेवारी 2020

लोकशाही निर्देशांक

लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले आहे. या यादीत भारताचा क्रमांक 51 वा आहे. गेल्या वेळेपेक्षा भारत दहा पायऱ्या खाली उतरला आहे. जागतिक लोकशाही निर्देशांकात 2019 मध्ये भारताचा गुणांक 6.9 होता, जो 13 वर्षांतील सर्वांत नीचांकी पातळीवर आहे. लोकशाही निर्देशांक अहवालानुसार जम्मू-काश्‍मीरमधून 370 वे कलम हटविणे आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यामुळे भारताच्या लोकशाही निर्देशांकाचा गुणांक खालावला आहे.
“द इकॉनॉमिस्ट’ने 2006 मध्ये हा निर्देशांक जाहीर करण्यास सुरवात केली. तेव्हापासून आतापर्यंत 13 वर्षांतील हा भारताचा सर्वांत कमी निर्देशांक आहे. 2014 मध्ये सर्वांत जास्त निर्देशांक 7.92 होता. निवडणूक प्रक्रिया आणि बहुसंख्याकांची स्थिती, सरकारी कार्यप्रणाली, राजनैतिक भागीदारी, राजकीय संस्कृती आणि सामाजिक स्वातंत्र्य या पाच मुद्यांवर लोकशाही निर्देशांक निश्‍चित केला जातो.
तेरा वर्षांत भारताच्या लोकशाही निर्देशांकातील घट
2006 : 7.68
2008 : 7.8
2010 : 7.28
2011 : 7.3
2012 : 7.52
2013 : 7.69
2014 : 7.92
2015 : 7.74
2016 : 7.81
2017 : 7.23
2018 : 7.23
2019 : 6.9
निर्देशांकातील पहिले पाच देश आणि गुणांक
9.87 : नॉर्वे (प्रथम)
9.58 : आइसलॅंड (द्वितीय)
9.38 : स्वीडन (तृतीय)
9.26 : न्यूझीलंड (चौथा)
9.25 : फिनलंड (पाचवा)
तळातील पाच देशांचे गुणांक कंसात यादीतील क्रमांक
1.61 : चाड (163)
1.43 : सीरिया (164)
1.32 : मध्य आफ्रिका प्रजासत्ताक (165)
1.13 : लोकशाही प्रजासत्ताक कांगो (166)
1.08 : उत्तर कोरिया (168)

नागरिकत्व कायद्याला स्थगितीस तूर्त नकार

केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीस स्थगिती देणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांतून भारतात आलेल्या मुस्लिमेतर अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात आहे. 

झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे. दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १० कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.
मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही. ग्रीनपीसच्या भारतीय शाखेने एअरोपोकॅलप्स ४ अहवाल मंगळवारी जारी केला असून त्यात देशातील शहरांच्या हवा प्रदूषणाचा ताळेबंद मांडला आहे. २०१८ मध्ये देशातील एकूण २८७ शहरांच्या हवेचे ५२ दिवस निरीक्षण करून असे सांगण्यात आले, की २३१ शहरांत पीएम १० कणांचे प्रमाण हे धोकादायक पातळीपेक्षा अधिक आहे. भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६० मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १० कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.

पहिल्या लेडी रोबोची झलक 

इस्रोच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 2021 हे साल उजाडणार असलेतरीसुद्धा या मोहिमेच्या आधीच “गगनयान’च्या माध्यमातून व्योममित्र नावाची लेडी रोबी भारताकडून अवकाशात पाठविण्यात येईल. बंगळूर येथे “ह्युमन स्पेसफ्लाइट अँड एक्‍स्प्लोरेशन- प्रेझेंट चॅलेंजेस अँड फ्युचर ट्रेंड्‌स’ या विषयावर आयोजित विशेष चर्चासत्रामध्ये या रोबीची छोटीशी झलक पाहायला मिळाली. या लेडी रोबोला “व्योममित्र’ असे नाव देण्यात आले असून, ते संस्कृत आहे. यातील “व्योम’ या शब्दाचा अर्थ अवकाश होय.

#chalughadamodi #mpsc #MpscMantra #currentaffairs #mpscchalughadamodi

2 thoughts on “चालू घडामोडी : 23 जानेवारी 2020”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *