चालू घडामोडी : 12 फेब्रुवारी 2020

गगनयान मोहिमेतील चौघांचे रशियात प्रशिक्षण सुरू

भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत प्राथमिक निवड करण्यात आलेल्या चार उमेदवारांचे प्रशिक्षण रशियातील मॉस्को येथे असलेल्या गागारिन संशोधन व अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात (जीसीटीसी) सुरू झाले आहे. मानवी अवकाश मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र व ग्लावकॉसमॉस यांच्यात २७ जून २०१८ रोजी करार झाला होता. भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड यात अवकाशवारीसाठी करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था २०२२ मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीयांना अवकाशात पाठवणार आहे. या मोहिमेत एकूण तीनजणांना सात दिवस अवकाशवारीची संधी मिळणार असून गगनयान मोहिमेचा खर्च १० हजार कोटींच्या घरात आहे. पृथ्वीपासून ३००-४०० कि.मी.च्या कक्षेत हे अवकाशवीर यानातून फिरणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आम आदमी पक्षाने’ ६२ जागांवर विजय मिळवला. गेल्या वेळेपेक्षा ही संख्या पाचने कमी आहे. भाजपला केवळ आठच जागा जिंकता आल्या.
पक्ष व जिंकलेल्या जागा
आप – ६२ (२०२०), ६७ (२०१५)
भाजप – ८ (२०२०), ३ (२०१५)
काँग्रेस – ० (२०२०), ० (२०१५)
पक्ष व मतांची टक्केवारी
आप – ५३% (२०२०), ५४% (२०१५)
भाजप – ३८% (२०२०), ३२% (२०१५)
काँग्रेस – ४% (२०२०), १०% (२०१५)

बसपा ०.६७, जदयू ०.९८ व नोटा ०.४० अशी इतरांची टक्केवारी आहे.

एनआयबीएम संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम

पुण्यातील राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचा (एनआयबीएम) सुवर्णमहोत्सव कार्यक्रम १२ फेब्रुवारी रोजी पार पडला. राष्ट्रपती राम नाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एनआयबीएम सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण तसेच एका कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले. एनआयबीएमच्या सुवर्णमहोत्सवावरील टपाल तिकीट जरी करण्यात आले.
एनआयबीएमविषयी:-
14 बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले त्यावेळी राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून 1969 मध्ये राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून क्षमता बांधणी, संशोधन आणि सल्लामसलत या दृष्टीने ही संस्था बँकिंग क्षेत्रासाठी योगदान देत आहे. 31 डिसेंबर 2019 पर्यंत संस्थेने देशातील आणि परदेशातील बँका आणि वित्तीय संस्थांमधल्या 1,10,000 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. परदेशातल्या क्षमता बांधणीच्या गरजाही संस्था पूर्ण करते. चालू वर्षात सुमारे 60 हून अधिक देशातल्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. देशातील बँकिंग यंत्रणांमध्ये धोरणनिर्मितीत संस्थेने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
2003 पासून संस्थेने बँकिंग आणि वित्त शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आणि 2017 पासून ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले. स्थापनेपासूनच आपल्या विद्यार्थ्यांसाठी 100 टक्के प्लेसमेंटचे उदिृष्ट संस्थेने साध्य केले असून संस्थेचे अनेक विद्यार्थी बँका, सल्लागार कंपन्या, मानांकन संस्था, वित्तीय संस्थांमध्ये उच्च पदांवर पोहोचले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारतभेटीवर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे ११ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले.

Donald-Trump

मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका पोचवणाऱ्या मांगूर जातीच्या माशाचे उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर केंद्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. पालघर जिल्ह्यातही थाय मांगूर आणि आफ्रिकन मांगूर प्रजातीच्या मांगूर मासा उत्पादनावर बंदी आहे.

आंतरराष्ट्रीय हवामान सेवा परिषद
ठिकाण : भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था, पुणे
आवृत्ती : सहावी
पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजन

सेंटर फॉर युएव्ही इन बिल्ट एन्व्हायर्नमेंट (क्यूब)
जमीन मोजणी, वास्तूरचना, स्थापत्य अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात ड्रोनच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राची स्थापना डॉ. भानूबेन नानावटी वास्तुरचना महाविद्यालयात (पुणे) स्थापन करण्यात आले आहे.
ड्रोनच्या वापराविषयी मार्गदर्शन केंद्र सुरु करणारे BNCA हे देशातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.

फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला (एनआयएफएम) माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ‘अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था’ असे संस्थेचे नामकरण होईल. 1993 मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून दिवंगत अरुण जेटली यांनी या संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे.

लोकसंख्या दर :- जागतिक लोकसंख्या अहवाल 2019 नुसार वर्ष 2027 च्या सुमाराला भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. जनगणना 2011 नुसार देशाचा दशकीय वृद्धी दर 17.7 टक्के होता. महाराष्ट्रातला दशकीय वृद्धी दर 16 टक्के होता. एकूण प्रजनन दर कमी होऊन 2017 मध्ये तो 2.2 वर आला आहे. 2005 मध्ये तो 2.9 होता. किशोरवयीन जन्मदर निम्म्याने कमी होऊन 8 टक्क्यांवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.