चालू घडामोडी : 12 ऑगस्ट 2018

राम सेवक शर्मा :-
» भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (TRAI-Telecom Regulatory Authority of India) अध्यक्षपदी नेमणूक.
» कार्यकाल – 30 सप्टेंबर 2020 पर्यंत
» भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा 1997 नुसार या प्राधिकरणाची स्थापना झाली.
» मुख्यालय :- नवी दिल्ली

एक जिल्हा एक उत्पादन संमेलन(One District One Product) :-
» लखनौ (उत्तर प्रदेश) येथे राष्ट्रपति रामनाथ कोविन्द यांनी 10 ऑगस्ट रोजी या संमेलनाचे उद्घाटन केले.
» आयोजक :- उत्तर प्रदेश सरकार
» हेतु? :- पारंपरिक उद्योग आणि स्थानिक व्यापरांना उत्तेजन देणे
» टॅगलाइन :- नई उड्डाण, नई पहचान

नीरज चोप्रा :-
» भारताचा भलाफेकपटू
» 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तो भारताचा ध्वजवाहक असेल.
» जकार्ता (इंडोनेशिया) येथे या स्पर्धा होणार आहेत.

न्या.गीता मित्तल :-
» त्यांनी नुकतीच जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली.
» त्यांना राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी शपथ दिली.
» त्या जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत.

कांचनजुंगा जिवावरण राखीव (Khangchendzonga Biosphere Reserve):-
» या क्षेत्राचा यूनेस्कोने ‘जिवावरण राखीवचे जागतिक नेटवर्क’मध्ये (WHBR- World Network of Biosphere Reserve) समावेश केला आहे.
» या नेटवर्कमध्ये समाविष्ट होणारे हे भारतातील 11 वे जिवावरण राखीव क्षेत्र ठरले.
» कांचनजुंगा हे देशातील सर्वांत उंचीवरील जिवावरण राखीव क्षेत्र आहे.
» कांचनजुंगा हे जगातील तिसरे सर्वांत उंच पर्वत शिखर आहे. (ऊंची – 8,586 मीटर)
» स्थान :- सिक्किम
» यापूर्वी 2016 मध्ये अगस्थिमलाई (केरळ) जिवावरण राखीव क्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
» या नेटवर्क मध्ये स्थान प्राप्त करणारे पहिले भारतीय जिवावरण राखीव – निलगिरी
» देशात एकूण 18 जिवावरण राखीव क्षेत्र असून त्यापैकि 11 क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे.

WHBR मध्ये समाविष्ट देशातील जिवावरण राखीव क्षेत्र:-
Nilgiri, 2000
Gulf of Mannar, 2001
Sunderban, 2001
Nanda Devi, 2004
Nokrek, 2009
Pachmarhi, 2009
Similipal, 2009
Achanakmar-Amarkantak, 2012
Great Nicobar, 2013
Agasthyamala, 2016
Khangchendzonga, 2018

 

Leave a Reply

Your email address will not be published.