चालू घडामोडी – ५ मार्च २०२२

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही याठिकाणी तुमच्यासाठी ५ मार्च २०२२ च्या महत्त्वाच्या अलीकडील आणि ताज्या चालू घडामोडी देत आहोत. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या सर्व वृत्तपत्रांमधील नवीनतम चालू घडामोडी २०२२ चा समावेश आहे. तसेच शासनाच्या PIB, News On Air सारख्या अधिकृत संकेतस्थळांवरील चालू घडामोडी २०२२ चा यामध्ये समावेश आहे.
आगामी काळात होणाऱ्या विविध शासकीय भारती परीक्षांमध्ये चालू घडामोडी २०२२ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल…

माजी लष्कर प्रमुख एस. एफ. रॉड्रीग्स यांचे निधन

  • माजी लष्कर प्रमुख जनरल सुनिथ फ्रान्सिस रॉड्रीग्स यांचे ४ मार्च २०२२ रोजी गोव्यात निधन झाले.
  • लष्करी सामरिक मार्गदर्शक व विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती. १९९० ते १९९३ दरम्यान ते लष्कर प्रमुख होते. रॉड्रीग्स हे २००४ ते २०१० दरम्यान पंजाबचे राज्यपालही होते.

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला

  • रशियाने ४ मार्च २०२२ रोजी युक्रेनमधील झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करून ताबा मिळविला आहे.
  • झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून युक्रेनला 30 ते 40 टक्के अणुऊर्जा पुरवठा होतो.
  • चेर्नोबिल घटना – जगातील सर्वात भयानक आण्विक अपघातांपैकी एक अपघात म्हणजे चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेला स्फोट. २६ एप्रिल १९८६ रोजी मध्यरात्री प्रकल्पाच्या युनिट चारमधील अणूभट्टीमध्ये जोरदार स्फोट होताच मोठा किरणोत्सार सुरू झाला.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रॉडनी मार्श कालवश

  • ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्श यांचे ४ मार्च २०२२ रोजी निधन झाले. मार्श यांची ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यांनी १९७० ते १९८४ या कालावधीत ९६ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल (३४३) पकडण्याचा विक्रम अनेक वर्षे त्यांच्या नावे होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *