चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१

चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर

 • निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
 • मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल आणि सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील.
 • पाच राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे.
 • पाच राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, १८.६ कोटी मतदार आहेत.

हिमा दास आसामच्या पोलीस उपअधीक्षक पदी

 • आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत २६ फेब्रुवारी २०२१ रोजी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
 • माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले.
 • हिमा दास ही एक भारतीय धावपटू असून २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. (चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१)

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कायदा पारित

 • ऑस्ट्रेलियाच्या संसदेने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक ऐतिहासिक विधेयक पारित केले.
 • त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
 • सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरलाय.

युसूफ पठाण निवृत्त

 • भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाण याने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी निवृत्ती जाहीर केली.
 • युसूफ पठाणने २००७ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाकडून ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळले.
 • २००७च्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघात युसूफचा समावेश होता. तसेच, २०११च्या विश्वविजेत्या भारतीय चमूतही युसूफ समाविष्ट होता.
 • युसूफने बडोदा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळले.
 • त्याशिवाय, राजस्थान आणि कोलकाता या दोन संघांकडून त्याने IPL मध्ये दमदार कामगिरी करून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *