‘ध्रुवास्त्रा’ची चाचणी यशस्वी
⮞ चाचणी ठिकाण : बालासोर (ओडिशा)
⮞ दिनांक : १५ व १६ जुलै २०२०
⮞ रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र
⮞ क्षमता : ७ कि.मी.
⮞ ते प्रत्यक्षात नाग (हेलिना) क्षेपणास्त्र आहे, त्याचे नामकरण ‘ध्रुवास्त्र’ असे करण्यात आले आहे.
⮞ ‘हेलिना’ हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
⮞ त्याचा मूळ उद्देश शत्रूच्या रणगाडय़ांचा वेध घेणे हा आहे.
⮞ प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून ते सोडता येते.
⮞ सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र असून उंचीवरून हल्ला व थेट हल्ला असे दोन्ही प्रकार यात शक्य आहेत.
⮞ हेलिना शस्त्रास्त्र प्रणाली अजून लष्करात तैनात करण्यात आलेली नाही.
⮞ एकाच वेळी हेलिकॉप्टरला लावून आठ क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात.
⮞ त्यात ‘इमेजिंग इन्फ्रारेड सिकर’चा समावेश आहे.
Chalu ghadamodi july 2020
फ्लॉसी वाँग-स्ताल यांचे निधन
⮞ एड्सचा रेणवीय अभ्यास करणाऱ्या या महिला विषाणूशास्त्रज्ञ
⮞ त्यांचा जन्म चीनमधील ग्वांगझाऊचा.
⮞ चिनी कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्यांचे आईवडील हाँगकाँगमध्ये आले. हाँगकाँगमधून त्या अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आल्या.
⮞ त्यांनी जीवाणूशास्त्रात पदवी, तर रेणवीय जीवशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतली.
⮞ बेथेसडा येथील कर्करोग संशोधन केंद्रातील ‘गॅलो प्रयोगशाळे’त सुमारे १७ वर्षे त्यांनी कर्करोगावर संशोधन केले.
⮞ मानवी डीएनएत बदल करून पेशींवर हल्ले करणाऱ्या रेट्रो विषाणूंवर त्यांनी बरेच संशोधन केले होते.
⮞ २००३ मध्ये त्यांनी जिनॉमिक्स अॅण्ड प्रोटिऑमिक्समधील संशोधन लेखात नवीन प्रकारच्या रेट्रो विषाणूंचा उल्लेख केला होता.
Current Affairs July 2020
स्मूथ हँडफिश
⮞ टास्मानियाच्या समुद्र किनाऱ्याच्या तळाशी असणारा मासा
⮞ सिम्टेरिश्टिस युनिपेनीस या शास्त्रीय नावाच्या माशातील शेवटचा ज्ञात मासा
⮞ हँडफिश मध्ये १४ जाती अस्तित्वात होत्या, आता १३ जाती राहिल्या आहेत.
⮞ १९९६ मध्ये स्पॉटेड हँडफिश ही जात धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या यादीत होती.
⮞ स्मूथ हँडफिश या जातीचे मासे समुद्रात संथ ठिकाणी राहतात.
⮞ मार्च २०२० मध्ये हे मासे संपूर्ण नॅश पावलेले आहेत असे जाहीर करण्यात आले.
⮞ या जातीच्या अंशामध्ये विशिष्ट विकर असते. त्याचा वापर करून कोविड-१९ चे निदान करणारी चाचणी करतात.
मायलॅबच्या अँटीजन किटला मान्यता
⮞ मायलॅब’च्या अँटीजन किटला “भारतीय वैद्यक संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) उत्पादनाची परवानगी दिली आहे.
⮞ भारतात विकसित केलेले हे पहिले अँटीजन कोरोना टेस्टींग किट आहे.
⮞ विशेष म्हणजे हे कीट 450 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
⮞ आरटी-पीसीआर तंत्रज्ञानाने कोरोनाचे निदान करणारे पहिली स्वदेशी किटही मायलॅबने विकसित केले आहे.
⮞ देशातील जलद कोरोना चाचण्यांना चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या या किटचे नाव “पॅथोकॅच कोविड-19 अँटीजन रॅपिड टेस्टिंग किट’ असे आहे.
अँटिजेन म्हणजे काय?
⮞ विषाणूंच्या संसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने (अँटिजेन) तयार होतात. रुग्णाच्या श्वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर हे अँटिजेन आहेत की नाही, याची माहिती या पद्धतीतून मिळते. अर्थात, यासाठी विषाणूंचा संसर्ग कधी झाला, त्याचे नमुने कसे घेतले यावर या टेस्टचे निदान अवलंबून रहाते.
भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान
⮞ सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कोरोना यौद्धा म्हणून सर्वात पुढे येऊन काम करणाऱ्या पाच नर्सचा सन्मान करण्यात आला.
⮞ त्यामध्ये कला नारायणसामी या भारतीय नर्सचा समावेश आहे.
⮞ या सर्व नर्सेसना सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांच्याद्वारे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, एक ट्रॉफी आणि 10 हजार सिंगापूर डॉलर्स देण्यात आले.
⮞ २००० साली नर्सेसना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. आत्तापर्यंत ७७ नासेसना सन्मानित करण्यात आले आहे.
⮞ सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कोरोना यौद्धा म्हणून सर्वात पुढे येऊन काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या नर्सचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. कला नारायणसामी यांचा 5 नर्सेसमध्ये समावेश आहे, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
⮞ नारायणसामी या वुडलँड्स हेल्थ कँम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत.
