चालू घडामोडी : २३ ऑगस्ट

सरल निर्देशांक

 • SARAL – State Rooftop Solar Attractiveness Index
 • केंद्रीय ऊर्जा व नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी हा निर्देशांक जाहीर केला.
 • नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालय, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) आणि अर्न्स्ट अँड यंग यांच्या संयुक्त विद्यमाने सरल निर्देशांक तयार केला आहे.
 • पहिले चार राज्य :
 • कर्नाटक
 • तेलंगणा
 • गुजरात
 • आंध्र प्रदेश

सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते

 • औद्योगिक मासिक फोर्ब्सने २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील अभिनेत्यांची यादी जाहीर केली
 • या यादीत अक्षय कुमारने सलग दुसऱ्या वर्षी स्थान पटकावले असून यादीत अक्षय चौथ्या स्थानी आहे.
 • ‘फोर्ब्स’च्या नोंदीनुसार १ जून २०१८ पासून १ जून २०१९ या काळात अक्षयची कमाई सुमारे ६ कोटी ५० लाख डॉलर (४६५ कोटी रुपये) होती.
 • गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या अभिनेता जॉर्ज क्लूनीला यावेळी पहिल्या दहामध्ये स्थान घेता आले नाही.
 • सर्वाधिक कमाई करणारे पहिले दहा अभिनेते:
 • ड्वेन जॉनसन – 489.4 दशलक्ष डॉलर्स
 • ख्रिस हेम्सवर्थ – 476.4 दशलक्ष डॉलर्स
 • रॉबर्ट डाऊनी जूनियर – 66 दशलक्ष डॉलर्स
 • अक्षय कुमार – 65 दशलक्ष डॉलर्स
 • जॅकी चॅन – 58 दशलक्ष डॉलर्स
 • ब्रॅडली कूपर – 57 दशलक्ष डॉलर्स
 • अ‍ॅडम सँडलर – 57 दशलक्ष डॉलर्स
 • ख्रिस इव्हान्स – 43 दशलक्ष डॉलर्स
 • पॉल रुड – 41 दशलक्ष डॉलर्स
 • विल स्मिथ – 35 दशलक्ष डॉलर्स

स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल

बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अभिनंदन याना वार रूम मधून मार्गदर्शन करणाऱ्या IAF च्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना ‘युद्ध सेवा मेडल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मार्गदर्शन केले होते.

जम्मू काश्मीर बाबत UNSC ची बैठक

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीची (UNSC) काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी १६ ऑगस्ट २०१९ रोजी बैठक झाली.‌ गेल्या 54 वर्षांत केवळ‌ काश्मीर‌प्रश्नावर ‌बैठक‌ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी‌ 1965 मध्ये युएनएससीची काश्मीरबद्दल बैठक झाली होती. ही बैठक पूर्ण सुरक्षा समितीची बैठक नसून पूर्ण बैठकीआधी चर्चेचे स्वरूप ठरविण्यासाठी ही बैठक पार पडली. चीनच्या मदतीनं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होते. अखेर चीननं याबद्दल बैठक घेण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.