चालू घडामोडी – २० मे २०२२

देशात पहिल्यांदाच 5G कॉलची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी

  • १९ मे २०२२ रोजी भारतातील पहिल्यांदाच IIT मद्रास येथे 5G कॉलची यशस्वी चाचणी घेण्यात आली, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
  • दरम्यान 5G टेस्ट बेड एकूण 8 संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखाली ते विकसित करण्यात आले आहे.
  • IT दिल्ली, IIT हैदराबाद, IIT बॉम्बे, IIT कानपूर, IISc बंगलोर, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWiT) या प्रोजेक्टमध्ये समावेश आहे.

भारताची निखात झरीन ठरली नवी बॉक्सिंग चॅम्पियन

भारतीची महिला बॉक्सर निखात झरीनने महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये 52 किलो वजनी गटात थायलंडची बॉक्सर जितपॉन्ग जुटामासचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.
फायनलमध्ये प्रवेश करताना तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डे अल्मैडाचा पराभव केला. हा सामना इस्तांबूलमध्ये झाला होता.
सहा वेळची विजेती मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएळ आणि लेखा सी या भारतीय बॉक्सरनी आतापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे.
आता हैदराबादच्या झरीनला देखील या यादीत आपले नाव कोरण्याची संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेत भारताने 2006 मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने आठ पदकांची कामाई केली होती. यात चार सुवर्ण आणि एक रौप्य तर तीन कांस्य पदकांचा समावेश होता.
गतवर्षी भारताच्या चार बॉक्सरनी पदक जिंकले होते. यात मंजू राणीने रौप्य मेरी कोमने कांस्य पदक जिंकून आपले वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आठवे पदक नावार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *