
करोनाच्या स्ट्रेनचे WHOकडून नामकरण
- जागतिक आरोग्य संघटनेने विविध देशात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचे नामकरण केले आहे.
- या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आलेला आहे.
- त्यामुळे भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत.
- यात ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असे नाव देण्यात आले आहे. तर ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असे नाव देण्यात आले आहे.
- ब्रिटनमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये आढळून आलेल्या B.1.1.7या स्ट्रेनचे नाव अल्फा असे ठेवण्यात आले आहे.
- दक्षिण आफ्रिकेत B.1.351 करोनाचा स्ट्रेन आढळून आला होता. तो आता बेटा या नावाने ओळखला जाणार आहे.
- तर ब्राझीलमध्ये या वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारीमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनला गामा असे नाव देण्यात आले आहे.
- अमेरिकेतील स्ट्रेनला एप्सिलॉन, तर फिलीपाईन्समध्ये जानेवारी महिन्यात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचे नाव थीटा असे ठेवण्यात आले आहे.

साताऱ्यात नवा विक्रम
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला.
- यामध्ये २५. ५४ कि.मी रस्ता हा अवघ्या १४ तासांत पूर्ण करुन विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विक्रम स्थापित केला आहे.
देशद्रोहाची व्याख्या सर्वोच्च न्यायालय तपासणार
- देशद्रोह कायद्याची व्याख्या, विशेषत: माध्यमांचे अधिकार आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य, या पार्श्वभूमीवर तपासून पाहण्यात येईल, असे ३१ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
- याच आरोपावरून दाखल झालेल्या गुन्हय़ांत आंध्र प्रदेशातील टीव्ही ५ आणि एबीएन आंध्रज्योती या वृत्तवाहिन्यांवर कोणतीही बळाची कारवाई करू नये, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.
- वायएसआर काँग्रेसचे बंडखोर खासदार के. रघुरामकृष्ण राजू यांचे वादग्रस्त भाषण प्रसारित केल्याबद्दल आंध्र प्रदेश पोलिसांनी या दोन वृत्तवाहिन्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
- भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ ए (देशद्रोह) आणि कलम १५३ (भिन्न वर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करणे) यांमधील तरतुदींचा अर्थ हा विशेषत: माध्यमांचे अधिकार आणि भाषणस्वातंत्र्य या पार्श्वभूमीवर गरजेचे आहे, असे आमचे मत असल्याचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. एन. राव आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठाने म्हटले आहे.
जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे.
- चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती.
- यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.
- जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध केली जाते. जीड़ीपीसाठी देशातील उत्पादन आणि सेवांचा विचार केला जातो. कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात उत्पादन घटलं कींवा वाढलं यावर सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.
चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी
चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते.”टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.
दुसर्या महायुद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांचे अवशेष शोधणार
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्या महायुद्धात भारतात चारशेहून अधिक बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी गांधीनगरमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एनएफएसयू) कडे हातमिळवणी केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाअंतर्गत काम करणारी आणखी एक संस्था डीपीएएला एनएफएसयूचे तज्ञ मदत करतील. डीपीएए ही एक संघटना आहे जी युद्धाच्या वेळी गहाळ झालेल्या आणि पकडलेल्या सैनिकांची माहिती ठेवते.
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : संजीतला सुवर्ण
- आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ३१ मे २०२१ रोजी संजीतने भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. अमित पांघल आणि शिवा थापा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- ९१ किलो वजनी गटात संजीतने पाच वेळा आशियाई अजिंक्यपद विजेत्या आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व्हॅसिली लेव्हिलचा ४-१ असा पराभव केला.
- एकूण पदके १५
- पदके सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
- पुरुष १ २ २ ५
- महिला १ ३ ६ १०
अंबीटॅग – भारताचा पहिला स्वदेशी तापमान डाटा लॉगर
- पंजाबमधल्या आयआयटी, रोपारने नाशवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना प्रत्यक्ष तिथल्या तापमानाची नोंद करणारे अशा प्रकारचे पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण ‘अंबीटॅग’ (AmbiTag) विकसित केले आहे.
- नोंद केलेल्या या तापमानामुळे, जगभरातून कोणत्याही ठिकाणाहुन आणलेली ती विशिष्ट वस्तू वापरण्यासाठी योग्य आहे की तापमानातल्या फरकामुळे खराब झाली आहे हे समजण्यासाठी मदत होणार आहे.
- युएसबी उपकरण म्हणून विकसित करण्यात आलेले अंबीटॅग एकदा चार्ज केल्यानंतर आपल्या लगतच्या भोवतालाचे उणे 40 ते + 80 डिग्री पर्यंतच्या तापमानाची 90 दिवस नोंद करते.
अरुण कुमार मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष
- सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) नवे अध्यक्ष असतील.
- पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
- महेश मित्तर कुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील.
- माजी न्यायमूर्ती एच. एल. दत्तू हे गेल्या वर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून हे पद रिक्त होते.
- अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय पॅनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह