चालू घडामोडी – १८ ऑगस्ट २०२१

 • राज्यातील पहिले अद्ययावत बहुउद्देशीय कृषी संकुल कोणत्या ठिकाणी साकारण्यात येणार आहे? – वाशिम
 • १४ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या नागरी सहकारी बँकेचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना रद्द केला? – कर्नाळा नागरी सहकारी बँक (पनवेल)
 • कोणत्या राज्याने अलीकडेच १८ व्या शतकातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर ‘सांगोली रायन्ना’ यांची जयंती आयोजित केली होती? – कर्नाटक
 • गॉडफादर ऑफ सुडोकू म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले? – माकी काजी
 • कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील विस्थापित बंगाली समुदायाच्या सदस्यांना दिल्या गेलेल्या जात प्रमाणपत्रांतून ‘पूर्व पाकिस्तान’ हा उल्लेख वगळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली? – उत्तराखंड
 • कोकण २०२१ हा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडला? – ब्रिटन
 • इंद्र-२०२१ हा संयुक्त लष्कर सराव भारता आणि कोणत्या देशामध्ये पार पडला? – रशिया
 • ब्रिटिश कंपनी हाऊसफ्रेशने जाहीर केलेल्या २०२० मधील जगातील ५० सर्वात प्रदूषित शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या स्थानी आहे? – होतान (चीन)
 • जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? – भारत
 • Discordant Notes या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – रोहिंटन फली नरिमन (माजी न्यायाधीश)
 • कोणते राज्य ‘स्मार्ट आरोग्य कार्ड’ पुरवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? – ओडिशा
 • ऑलिम्पियन पीआर श्रीजेश यांची कोणत्या राज्याने साहसी पर्यटनाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? – केरळ
 • अलीकडेच काही पर्यावरणवाद्यांनी कोणत्या राज्यातील कडवूर राखीव जंगलाला स्लेंडर लॉरिस या प्राण्याच्या संवर्धनासाठी वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याची मागणी केली आहे? – तामिळनाडू
 • कोणत्या कंपनीने डिझेलची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ‘हाय स्पीड डिझेल’ची घरोघरी डिलीव्हरी सुरू केली आहे? – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)
 • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी राज्यातील कोणत्या स्थानिक विमानतळाला महाराजा अग्रसेन यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे? – हिसार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *