चालू घडामोडी – १६ ऑगस्ट २०२१

 • शांतताकाळातील देशातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार अशोकचक्र २०२१ मध्ये कोणाला देण्यात आला आहे? – बाबू राम (मरणोत्तर)
 • १५ ऑगस्ट २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी १०० लाख कोटी रूपयांच्या कोणत्या योजनेची घोषणा केली? – पंतप्रधान गतीशक्ती महायोजना
 • जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२१ कोणत्या देशात पार पडली? – पोलंड
 • १४ ऑगस्ट २०२१ रोजी कोणत्या देशात ७.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला? – हैती
 • २७ सप्टेंबरपासून शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे? – दिल्ली सरकार
 • खालीलपैकी कोण ६९ वा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे? – हर्षित राजा
 • कोणत्या दिवशी जागतिक प्रीडायबेटिज दिन पाळण्यात आला? – १४ ऑगस्ट
 • कोणत्या देशाने विदेश प्रवास करू इच्छित नागरिकांसाठी कोणत्या देशाने डिजिटल VAX पासपोर्ट बनवण्याचा निर्णय घेतला आहे? – कॅनडा
 • कोणत्या देशाने अलीकडेच २९० किलोमीटर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? – पाकिस्तान
 • केंद्रीय कॅबिनेटने कोणाला गृहसचिव पदावर एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे? – अजय भल्ला
 • कोणत्या शहरातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चालकरहित विद्युत चारचाकी वाहन तयार केले आहे? – पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *