चालू घडामोडी वन लायनर – ४ जून २०२१

कोणत्या भारतीय शिक्षकाची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – रंजितसिंह डिसले
२०२१ चा प्रतिष्ठेचा टेम्पलटन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – जेन गुडाल
महागड्या तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत २० टक्के इथॅनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?- २०२३
२०२० मध्ये भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केलेल्या अनिरुद्ध जुग्नौठ यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आणि अध्यक्ष होते? – मॉरिशस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? – महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना
बेलग्रेड ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? – नोवाक जोकोविच (सर्बिया)
‘Languages of Truth: Essays 2003-2020’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – सलमान रश्दी
जगातील सर्वात मोठा पर्यावरण फिल्म फेस्टिवल दरवर्षी मार्च महिन्यामध्ये कोणत्या शहरात होतो? – वाशिंग्टन
मुलांना कोविड संक्रमणापासून कसे रोखता येईल याविषयी पालक आणि शिक्षक याच्यामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी कोणत्या राज्याने ‘राबता मोहीम’ राबवली आहे? – पंजाब
राज्यात १५.६ लाख घरांची निर्मिती करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ‘जगन्ना कॉलनी प्रकल्प’ सुरु केला आहे? – आंध्र प्रदेश
भारतात आढळणाऱ्या कोणत्या माशाला IUCN च्या तांबड्या यादीतून (Red List) वगळण्यात आले आहे? – निळ्या रंगाचा महाशीर मासा
राष्ट्रीय स्तरावरील किमान वेतन निश्चिततेबाबत तांत्रिक माहिती आणि शिफारसी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? – अजित मिश्रा
नीती आयोगाने जाहीर केलेल्या एसडीजि निर्देशांक २०२०-२१ मध्ये पहिले स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे? – केरळ
नीती आयोगाने जाहीर केलेल्या एसडीजि निर्देशांक २०२०-२१ मध्ये शेवटच्या स्थानी कोणते राज्य आहे? – बिहार
फेंगयुन-४बी हा कोणत्या देशाचा पहिला नेक्स्ट जनरेशन हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. – चीन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) आयुक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – एस. व्ही. आर. श्रीनिवास
आशियाई युवा मॉडेल युनायटेड नेशन परिषदेत सर्वोत्कृष्ट प्रतिनिधीचा पुरस्कार कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने पटकावला आहे? – कविशा श्रॉफ
टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने देशात पहिले स्थान पटकावले आहे? – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *