वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिल्लीत परिषद

» संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची (UNCCD) “कॉन्फरन्स ऑफ पार्टीज‘ अर्थात कॉप-14 ही जागतिक परिषद येत्या 2 ते 13 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
» यानिमित्ताने जमिनीची हानी रोखण्याच्या उपायांचा “दिल्ली जाहीरनामा‘ ही प्रकाशित केला जाणार आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रातर्फे डेहराडून येथे “सेंटर ऑफ एक्‍सलन्स‘ ही संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
» वाळवंटीकरणाचा भयानक वेग रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून “कॉप 14′ ही आंतरराष्ट्रीय परिषद दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते.
» यापूर्वी याचे यजनामपद चीनकडे होते व आता ते भारताकडे आले आहे.
» नोएडा येथील पर्यावरण विभागाच्या भव्य संकुलात ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
» या परिषदेत 200 देशांचे 3000 प्रतीनिधी सहभागी होणार आहेत. त्यात 100 देशांचे पर्यावरण मंत्रीही असतील.
» जगाच्या एकूण भू-क्षेत्रफळातील नापीक व वाळवंट बनलेल्या जमिनीपैकी एक तृतीयांश म्हणजे 96 लाख हेक्‍टर जमीन भारतात असून 2020 पर्यंत अतिरिक्त 13 लाख हेक्‍टर जमीन पुन्हा सुपीक करण्याचेही केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे. यापुढच्या दहा वर्षांत 50 लाख हेक्‍टर जमीन पुन्हा सुपीक करण्याचे लक्ष्य भारत सरकारने समोर ठेवले आहे.

UNCCD :-

 • मसुदा : 17 जून 1994
 • स्वाक्षरी : 14 ऑक्टोबर 1994
 • ठिकाण : बॉन (जर्मनी)
 • अंमल : 26 डिसेंबर 1996
 • सदस्य : 197 (196+EU)
 • सचिवालय : बॉन (जर्मनी)
 • संयुक्त राष्ट्राचा वळवंटिकरण विरोधी करार

Conference of the Parties (COP):-

 • कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते.
 • 2001 पर्यंत दरवर्षी होत. त्यानंतर दर दोन वर्षांनी होते.
 • आत्तापर्यंतच्या परिषदा :-
  COP 1: रोम (इटली) (1997)
  COP 2: डकार (सेनेगल) (1998)
  COP 3: रीसाइफ (ब्राझील) (1999)
  COP 4: बॉन (जर्मनी) (2000)
  COP 5: जिनिव्हा (स्वित्झर्लंड) (2001)
  COP 6: हवाना (क्युबा) (2003)
  COP 7: नैरोबी (केनिया) (2005)
  COP 8: माद्रिद (स्पेन) (2007)
  COP 9: ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना) (2009)
  COP 10: चांगवॉन (दक्षिण कोरिया) (2011)
  COP 11: विंडोहोक (नामीबिया) (2013)
  COP 12: अंकारा (तुर्की) (2015)
  COP 13: ऑर्डोस सिटी (चीन) (2017)
  COP 14: नोएडा (भारत) (2019)

संकलन : बालाजी सुरणे (लेखक – सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी)
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा १२ वा अंक २ सप्टेंबर पासून उपलब्ध होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.