एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्य सेवा परीक्षा. (State Services Examination)
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा. (Maharashtra Forest Services Examination)
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. (Maharashtra Agricultural Services Examination)
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, ‘गट अ’ परीक्षा. (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, ‘गट ब’ परीक्षा Maharashtra Engineering Services, Gr-B Examination) दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. (Civil Judge (Jr.Div.) Judicial Magistrate (1 st Class) Competitive Exam.)
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा. (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा. (Police Sub Inspector Examination)
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा. (Sales Tax Inspector Competitive Examination)
- साहाय्यक परीक्षा. (Assistant Examination)
- लिपिक- टंकलेखक परीक्षा. (Clerk typist Examination)
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
- उपजिल्हाधिकारी, गट- अ.
- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त, गट-अ.
- साहाय्यक विक्रीकर आयुक्त, गट- अ.
- उपनिबंधक, सहकारी संस्था, गट- अ.
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी(उच्च श्रेणी), गट- अ.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ.
- मुख्याधिकारी, नरगपालिका/ परिषद, गट- अ.
- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट- अ.
- तहसीलदार, गट-अ.
- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट- ब.
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- ब.
- कक्ष अधिकारी, गट- ब.
- गटविकास अधिकारी, गट- ब.
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद, गट- ब.
- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट- ब.
- उपअधीक्षक, भूमी अभिलेख, गट- ब.
- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट- ब.
- नायब तहसीदार, गट- ब.