एमपीएससी आणि स्पर्धक

अक्षय सुक्रे (Bdo-2019 आणि तहसीलदार-2020) यांनी स्पर्धा परीक्षेतील विविध मुद्द्यांबाबत केलेले सविस्तर मार्गदर्शन..👇यांनी स्पर्धा परीक्षेतील विविध मुद्द्यांबाबत केलेले सविस्तर मार्गदर्शन..👇
आपला पण हाच मार्ग आहे का ?
१) मराठी भाषेतून पुस्तके वाचताना,स्टेट बोर्ड पुस्तके वाचताना लाज वाटून घेऊ नये.
२) एखादा प्रश्न,डाऊट, कन्सेप्ट कळत नसेल तर विचारण्यात कमीपणा वाटून न घेणे.
३) आपल्यापेक्षा लहान व्यक्तीकडून काही विचारण्यात कमी पणा वाटून न घेणे.(जेथून ज्ञान मिळेल तेथून जमा करावे).
४)दिवसाच्या शेवटी स्वतःचे मूल्यांकन करावे.
५)नियोजन करून अभ्यास करणे.दिवसातून किती वेळ अभ्यास होतो याचे परीक्षण करणे.त्यात बदल करणे.
६)अभ्यासात सातत्य ठेवावे.(वेळोवेळी घरी जाऊन त्यामध्ये गॅप पडू देऊ नये).
७) अभ्यास हा जीवन मरणाचा प्रश्न बनला तरी चालेल.
८)निस्वार्थ मनाने आपल्याजवळील ज्ञानाचे वाटप,संकलन करावे.
९)नुसते एकामागे एक पुस्तके वाचून काढून त्याचा काही उपयोग नाही.आपण प्रश्न सोडवता का?अचानक प्रश्न विचारल्यावर आपल्याला त्यातलं काहीतरी आठवत का? घोकंपट्टी करतो का?
१०)चर्चा करावी.(पण चर्चेत सर्व अभ्यासू शामील व्हावे).वायफळ चर्चा नको. ट्रिक्स बनवाव्या.
११) नोट्स काढल्या तर रिव्हिजन लवकर होईल.(मन आणि हाताचे गुंफण करावे).पण त्या स्वतःच्या असाव्यात.नोट्स दिल्यानं तो पुढे जाईल हा संकुचित विचार सोडावा.
१२)हसत खेळत शिकावं.म्हणजे नुसत उदास राहून,टेन्शन घेऊन अभ्यास करू नये.करमणुकीसाठी मूवी पहावी किंवा छंद जोपासा.
१३) पूर्णवेळ झोप घेऊन अभ्यास करावं.
१४)दिवसातून ७-८ तास तरी अभ्यास करावा.(आपल्याला दुसर काही काम नसेल तर).मग त्यासाठी वेळ ठरवूनच ठेवावी असे नाही.तुम्हाला योग्य वाटेल तेंव्हा करा.मग सकाळी ६-७ वाजताच लाल डोळे करून अभ्यासिकेत जाऊन बसण्यात काही अर्थ नाही.किंवा रात्री १-२ पर्यंत जागण्याची काही गरज नाही.
१५) दुसऱ्याच अनुकरण करू नये.(चांगल्या गोष्टींचा अपवाद)
हा जो पुस्तक वाचेल तोच मी वाचणार,हा रात्री अभ्यास करतो म्हणून मी पण रात्रीच करणार इ.
१६) मोबाईलचा वापर टाळला तर सोन्याहून पिवळ.कारण मोबाईलचा वापर करत अभ्यास होतो असे मला तरी वाटत नाही.अभ्यासिकेत मूवी,कॉमेडी शो,गेम खेळणे,राजकीय गप्पा टाळावे.
१७) रविवारला रविवार समजू नये.म्हंजे अभ्यास होत असताना देखील जाणूनबुजून खूप tired झाल्यासारखं टाईमपास करणे,त्या दिवशी झोपून राहणे,कपडे धुणे, मूवीला जाणे.
१८) सतत फिरायला जाणे,पार्ट्या,वाढदिवस साजरा करणे,ब्रीज वर वारंवार जाऊन बसणे टाळावे.
१९) नुसते इंस्पिरेशनल व्हिडिओ पाहणे,मार्गदर्शन करत फिरणे,नुसत्या बुकलीस्ट जमा करणे,कोणाला इम्प्रेस करण्यासाठी मेन्स दिली,हे केलं – ते केलं सांगणे,दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास करणे,इंग्लिश पेपर वाचणे,अधिकाऱ्यांच्या ओळखी काढणे,त्यावर चर्चा टाळावी.
२०) जास्त मित्रपरिवार बनवू नये.बनला तरी टाईमपास करू नये.(चहाच्या वेळी,बर्थ डे साजरा,सतत पार्ट्या,जेवायला तासनतास बसणे).
२१) प्रश्न सोडवावे,सखोल पुस्तके वाचावी,टेस्ट सीरिज लावली तर उत्तमच.
२२) नव्या उमेदीने अभ्यास करायचे २-३ वर्षच असतात.त्यामुळे प्रत्येक प्रयत्न हा पहिला आणि शेवटचा असं समजावं.तेंव्हाच अभ्यास करायला पाहिजे होता म्हणून नंतर वाईट वाटून घेऊ नये.
२३)एकवेळ योग्य पुस्तके(बुकलिस्ट)ठरवून घेऊन अभ्यास सुरू करावा.हे वाच – ते वाच,ते जमा कर.अश्याने एक ना धड भराभर चिंध्या होते.वाचन कमी आणि ढीगभर पुस्तके अशी अवस्था.
२४)सारखं एकच विषय घेऊन वाचत बसू नये.कोअर विषय छान वाचून घ्यावे.
२५)कमी पुस्तके,वारंवार रिविजन,एमपीएससी पेपर्स,सातत्य ठेवावे.
२६)व्यायाम करून आरोग्य चांगले ठेवावे.सतत रीविजन केल्यानी गोष्टी लक्षात राहतात.
२७)कोणताही विषय इंटरेस्ट घेऊन वाचवा.पहिल्यांदाच टेन्शन घेऊन,दुसऱ्याच ऐकुन त्या विषयाबाबत नकारात्मक विचार करून घेऊ नये.नाहीतर तो विषय हमेशा के लिये तुम्हाला कंटाळवाणा वाटेल.
२८)वर्तमानपत्र वाचताना संपादकीय पेज वाचावं.१ तास त्यासाठी खूप झालं.उगाच भरकटत जाऊ नये.लोकसत्ता आणि एक चांगली मॅगझीन खूप झालं.
२९) अभ्यास करताना काही क्षण मिस होऊ देऊ नका.(मी सणाला सुद्धा घरी जाणार नाही, घरच्यांना भेटणार नाही,मूव्ही पाहणार नाही,फिरायला जाणार नाही, हे करणार नाही,ते करणार नाही फक्त अभ्यास करेन) यामुळे तुम्ही जीवनाचे खूप अनमोल क्षण वाया घालवत आहात.
३०) ४-५ वर्षात जर एकही पूर्व परीक्षा पास झाला नसाल तर दुसरा मार्ग शोधावा.सल्ला देणाऱ्यालाच विरोध करून मैत्रीला दुभंगू नये.
31)अधिकारी मित्र जसा अभ्यास करत होते,तसाच मी करेन असा विचार सोडा.आपली स्ट्रटेजी बनवा.आपल नियोजन बनवा.(समजा मी सकाळी 10 वाजता उठून अभ्यास करणारा असेल तर तुम्ही पण असच करणार का? तुम्ही सकाळी 6 ला उठणारे असाल तर 4तास का टाइम्प्पास करणार का?)
३२) स्वयं निर्भर व्हा.प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर निर्भर राहू नका.
हा एक सल्ला समजावा.बाकी आपण सुजाण आहातच….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *