इंडोनेशियाची नवीन राजधानी

जाकार्ता या महानगरात झालेल्या गर्दीमुळे इंडोनेशियाची राजधानी येथून दुसरीकडे हलविण्यावर विचार सुरू असल्याचे तेथील सरकारने म्हटले आहे. इंडोनेशियाची नवी राजधानी पूर्वेकडे असलेल्या बोर्नियो बेटांवर असेल, अशी घोषणा अध्यक्ष जोको विडोडो यांनी केली. आग्नेय आशियाई द्वीपसमूहाच्या केंद्र बिंदूजवळ असलेल्या बोर्नियो बेटावर मोठ्या प्रमाणात वने आहेत. या बेटावरील सुमारे 180 हजार हेक्‍टर जमीन सरकारी मालकीची आहे. इंडोनेशियातील बालिकपापन आणि समरिंदा शहरांजवळ हे बेट आहे. हे बेट पूर्व कालिमंतान प्रांतात असून, या भागाला नैसर्गिक संकटांचा सर्वांत कमी धोका आहे. जाकार्ता हे पाचशे वर्षांपूर्वी डचांनी वसविलेले शहर आहे. 2050 पर्यंत जाकार्ता शहराचा एक तृतीयांश भाग समुद्रात बुडालेला असेल, अशी शक्‍यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.