अमृत संस्थेच्या स्थापनेस मान्यता

  • खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने २० ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली.
  • अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
  • या संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील गरीब युवक, युवती, विद्यार्थी यांना रोजगार, स्वयंरोजगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी खास प्रशिक्षण तसेच परदेशातील उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.
  • अमृत : अकॅडेमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेन्ट अँड ट्रेनिंग

विविध वर्गासाठी कार्यरत संस्था :-

  • बार्टी : अनुसूचित जाती (बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने)
  • महाज्योती : ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग (महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने)
  • सारथी : शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास मराठा समाजासाठी (छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने)

Leave a Reply

Your email address will not be published.